Maharashtra Revenue Department operations during the announcement of 11 new Additional Collector offices to strengthen district administration. Maharashtra Revenue Department operations during the announcement of 11 new Additional Collector offices to strengthen district administration.
प्रशासन

Maharashtra Government : बारामती, फलटण, चाळीसगाव, अचलपूरसह 11 तालुक्यांसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालये मंजूर; 69 शहरांमध्ये होणार अपर तहसील कार्यालय

Additional Collector offices Maharashtra : शासकीय कार्यालयांतील कामकाजाचा वाढता व्याप तसेच सर्वसामान्य नागरीकांना होणारा त्रास, जिल्हा व तालुक्यांचे भौगोलिक क्षेत्र, वाढती लोकसंख्या आणि त्या आनुषंगिक बाबींमुळे आवश्यकतेनुसार अपर जिल्हाधिकारी व अपर तहसीलदार कार्यालय निर्मितीची गरज बैठकीत व्यक्त केली होती.

Jagdish Patil

Additional Collector offices Maharashtra : राज्यातील सहा विभागांत ११ अपर जिल्हाधिकाऱ्यांची, तर ६९ अपर तहसीलदार कार्यालयांची नव्याने निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागविली आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच खात्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. शासकीय कार्यालयांतील कामकाजाचा वाढता व्याप तसेच सर्वसामान्य नागरीकांना होणारा त्रास, जिल्हा व तालुक्यांचे भौगोलिक क्षेत्र, वाढती लोकसंख्या आणि त्या आनुषंगिक बाबींमुळे आवश्यकतेनुसार अपर जिल्हाधिकारी व अपर तहसीलदार कार्यालय निर्मितीची गरज बैठकीत व्यक्त केली होती.

अपर जिल्हाधिकारी कार्यालयांसाठी...

नव्याने अपर जिल्हाधिकारी कार्यालयांच्या निर्मितीसाठी प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या तालुक्यांची संख्या लक्षात घेणार. लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ, आदिवासी तसेच दुर्गम क्षेत्र लोकसंख्या असलेल्या तालुक्यांची संख्या पाहणार.

जिल्हा मुख्यालयापासून प्रस्तावित कार्यालयाचे अंतर, तालुक्यांतील सर्वात दूरच्या गावांचे मुख्यालयापासूनचे अंतर तसेच प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन झाल्यास येणारे अंतर लक्षात घेणार.

अपर तहसील कार्यालयांसाठी...

नव्या अपर तहसील कार्यालयांसाठी महसूल मंडळांची महसुली गावांच्या नावासहित संख्या पाहणार. लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, आदिवासी व दुर्गम क्षेत्रातील लोकसंख्या विचाराच घेणार, तसेच महसुल मंडळांची संख्या, महसुली गावांची संख्या, प्रस्तावित तालुका मुख्यालयापासून सर्वात दूरच्या गावांचे अंतर, प्रस्तावित अपर तहसील कार्यालय स्थापन झाल्यास येणारे अंतर यांचा विचार करणार.

इथे होणार अपर जिल्हाधिकारी कार्यालये

पुणे विभाग : पुणे जिल्ह्यात बारामती, सातारा जिल्ह्यात फलटण, तर सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर.

कोकण विभाग : ठाणे जिल्ह्यात कल्याण तर रत्नागिरी जिल्ह्यात दापोली.

नाशिक विभाग : जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव.

छत्रपती संभाजीनगर विभाग : नांदेड जिल्ह्यात किनवट.

अमरावती विभाग : अमरावती जिल्ह्यात अचलपूर, यवतमाळ जिल्ह्यात पुसद तर बुलडाणा जिल्ह्यात खामगाव.

नागपूर विभाग : नागपूर जिल्ह्यात कळमेश्‍वर.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT