Maharashtra Sahakar Awards Sakarnama
प्रशासन

Sahakar Awards : सहकार पुरस्कारांच्या रकमेत घसघशीत वाढ; 13 वर्षांनंतर राज्य सरकारने केली सुधारणा

Sahakar Awards Increase | Maharashtra Govt GR | Cooperative Sector : २०२५ हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत.

Rajanand More

Maharashtra Sahakar Awards : महाराष्ट्र सरकारकडून २०१२-१३ पासून सहकार पुरस्कार दिले जातात. या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यासाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात. त्यामध्ये सहकार महर्षी, सहकार भूषण आणि सहकार निष्ठ या पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारांच्या रकमेत आता सरकारने १३ वर्षांनंतर घसघशीत वाढ झाली आहे.

राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने सोमवारी याबाबतचा जीआर काढला आहे. २०१२-१३ मध्ये निश्चित केलेल्या पुरस्कार रकमेला १२ वर्षांचा कालावधी उलटून गेला असून बक्षीस रक्कमेमध्ये कालानुरूप वाढ करणे आवश्यक होते, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

पुरस्काराच्या रकमेत वाढ केल्यास जास्तीत जास्त सहकारी संस्थांना अधिक चांगले काम करण्यास प्रोत्सहन मिळेल, ही बाब विचारात घेऊन राज्य शिखर समितीच्या १४ जुले २०२५ रोजीच्या बैठकीत पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागाने महिनाभरापूर्वी सादर केलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत ग्रीन सिग्नल देण्यात आला. त्यानुसार आज याबाबतचा जीआर काढण्यात आला.   

सहकार महर्षी पुरस्काराची रक्कम एक लाख रुपये एवढी होती. आता त्यामध्ये तिपटीने वाढ करून ती तीन लाखांवर नेण्यात आली आहे. सरकारकडून सहकार भूषण नावाने २१ तर सहकार निष्ठ नावाने २३ पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी अनुक्रमे ५१ हजार व २५ हजार रुपये रक्कम निश्चित करण्यात आली होती. ही रक्कम आता अनुक्रमे दीड लाख आणि ५१ हजार अशी करण्यात आली आहे.

सरकारने काढलेल्या जीआरनुसार एकूण ४५ पुरस्कारांसाठी आतापर्यंत १७ लाख ४६ हजार रुपये पुरस्काराची रक्कम होते. आता ही रक्कम ४६ लाख २३ हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार २०२५-२६ या वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान, २०२५ हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. त्याअंतर्गतच पुरस्कारांची रक्कम वाढविण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT