Maharashtra government introduces strict rules against misleading school names like ‘International’ and ‘Global’ sarkarnama
प्रशासन

Schools In Maharashtra : गल्लीबोळात उभ्या राहणाऱ्या 'इंटरनॅशनल आणि ग्लोबल' शाळांना महाराष्ट्र सरकारचा दणका : नव्या नियमांचा काढला GR

Schools In Maharashtra : महाराष्ट्र सरकारने ‘इंटरनॅशनल, ग्लोबल’ नावाने दिशाभूल करणाऱ्या शाळांवर कारवाई केली आहे.

Hrishikesh Nalagune

School : 'इंटरनॅशनल, ग्लोबल, वर्ल्ड' अशी आकर्षक नाव देऊन पालक, विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या बोगस शाळांना महाराष्ट्र सरकारने दणका दिला आहे. अशा नावांना लगाम लावत शाळा देण्यात येणाऱ्या नावांबाबत नवी नियमावलीच आखूण दिली आहे. नवीन शाळा सुरू करताना आता सर्रास असे शब्द वापरता येणार नाहीत. तसेच दर्जावाढसाठी अर्ज करताना विद्यमान शाळांचीही छानणी होणार आहे.

स्वयंअर्थसहाय्य तत्त्वावर अनेक खासगी शाळा महाराष्ट्राच्या गल्लीबोळात उभ्या राहिलेल्या आहेत. या शाळांच्या नावात 'इंटरनॅशनल, ग्लोबल', 'वर्ल्ड' अशा आकर्षक पण दिशाभूल करणाऱ्या शब्दांचा सर्रास वापर होतो. प्रत्यक्षात त्यांचा आंतरराष्ट्रीय मंडळाशी कोणताही संबंध नसतो. या शाळांचा अभ्यासक्रम, तिथल्या सुविधा या आंतरराष्ट्रीय पातळीसोबत सुसंगत नसतात. त्यामुळे पालकांमध्ये गैरसमज निर्माण होतो.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अशा बोगस शाळांविरोधात राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. आता नव्याने उभ्या राहणाऱ्या शाळांना त्यांच्या नावांमध्ये सर्रास असे शब्द वापरता येणार नाहीत. दर्जावाढसाठी अर्ज करताना विद्यमान शाळांचीही छानणी होणार आहे. या शाळांमध्येही असे बोगस प्रकार आढळल्या त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.

'इंटरनॅशनल, ग्लोबल, वर्ल्ड' हे शब्द वापरायला बंदी :

  • शासनाच्या नव्या नियमांनुसार, केवळ आय.बी., केंब्रिज, आय.जी.सी.एस.ई. अशा आंतरराष्ट्रीय मंडळांशी संलग्न असलेल्या किंवा संलग्न होण्याच्या प्रक्रियेत असलेल्या शाळांनाच 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल', 'युनिव्हर्सल, वर्ल्ड' असे शब्द वापरण्याची मुभा असणार आहे.

  • राज्य मंडळ, सीबीएसई किंवा इतर राष्ट्रीय मंडळांशी संलग्न शाळांना अशा शब्दांचा वापर करता येणार नाही.

  • 'कॉन्व्हेंट' हा शब्द केवळ ख्रिश्चन धर्मसंघांच्या शाळांसाठीच मर्यादित ठेवण्यात आला आहे.

  • 'सैनिक' हा शब्द केवळ मान्यताप्राप्त सैनिक शाळांनाच वापरता येणार आहे.

ग्राहक संरक्षण कायद्याचा आधार :

ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अंतर्गत कलम (२) (१) आणि (२) (२८) मध्ये 'दिशाभूल करणाऱ्या जाहिराती' याचा उल्लेख आहे. याच तरतुदींनुसार ही कारवाई केली असल्याचे शासनाने जीआरमध्ये म्हटले आहे. या कलमाचे उल्लंघन करून पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT