Narendra Modi Sarkarnama
प्रशासन

Modi Goverment : मोदी सरकार करणार मोठी घोषणा; 48 लाख कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार !

Goverment News : अंतरिम अर्थसंकल्पानंतर देशात सार्वत्रिक निवडणुका जाहीर होतील, अशी शक्यता आहे.

Sachin Waghmare

Delhi News: आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोकरदार वर्गांना खुश करण्याची तयारी केंद्र सरकारकडून सुरु आहे. आगामी काळात होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पानंतर देशात सार्वत्रिक निवडणुका जाहीर होतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून मोठी घोषणा होऊ शकते.

येत्या काळात लवकरच केंद्र सरकार 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूश करणारा निर्णय घेणार असल्याची चर्चा जोरात आहे. हा निर्णय सातव्या वेतन आयोगाच्या महागाई भत्त्याशी संबंधित नाही, तर वर्षानुवर्षे करण्यात येत असलेल्या फिटमेंट फॅक्टरच्या मागणीशी संबंधित आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) या येत्या 1 फेब्रुवारीच्या अंतरिम अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करू शकतात.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Goverment ) मूळ वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे.केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढ व्हावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. आता त्यासंबंधित केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. देशातील सरकारी कर्मचारी अंतरिम अर्थसंकल्पाची आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.

त्यामध्ये फिटमेंट फॅक्टर घोषित केला जाऊ शकतो. त्यात वाढ करण्याची मागणी केंद्रीय कर्मचारी संघटना अनेक दिवसांपासून करत आहे. या फिटमेंट फॅक्टरच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार ठरवले जातात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ नेमकी कशी होते?

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ कशी होणार हे उदाहरण देऊन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के आहे. जर एखाद्याचा ग्रेड पे 4,200 रुपये असेल तर त्याचे मूळ वेतन 15,500 रुपये असेल. या प्रकरणात कर्मचार्‍याचा एकूण पगार 15,500 × 2.57 म्हणजेच 39,835 रुपये इतका होईल. हा फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. असे झाल्यास मूळ वेतनात मोठी वाढ होऊन कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारातही वाढ होणार आहे.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT