MPSC Group C Exam 2026 | New Exam Date Sarkarnama
प्रशासन

MPSC Exam postponed : MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! गट-क परीक्षेची तारीख बदलली

MPSC Group C Exam 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली असून 25 ऑक्टोबरऐवजी आता 3 जानेवारी 2027 रोजी परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्रांची उपलब्धता, सणांचा कालावधी, वाहतूक व्यवस्था आणि इतर प्रशासकीय बाबींचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

Jagdish Patil

MPSC Exam postponed : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी घेण्यात येणार होती.

मात्र, आता परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असून नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यासंदर्भातील पत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षा पुढे ढकलण्यामागे आयोगाने विविध प्रशासकीय बाबींचा विचार केल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा उपकेंद्रांची उपलब्धता आणि जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेले अहवाल, सणांचा कालावधी, स्थानिक परिस्थिती. तसेच वाहतूक व्यवस्था आणि उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर सुरक्षित व वेळेत पोहोचण्यासाठी येणाऱ्या अडचणी.

यासह यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा, आगामी राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2026, सरळसेवा भरती, इतर भरती संस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक आणि हिवाळी अधिवेशन यांसारख्या बाबींचाही आयोगाने विचार केल्याचं पत्रकात म्हटलं आहे.

तर महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 आता 3 जानेवारी 2027 रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षेचे केंद्र, प्रवेशपत्र, केंद्रनिहाय आवश्यक सूचना तसेच इतर माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असून परीक्षार्थींनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचना नियमितपणे तपासाव्यात आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आयोगाकडून करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT