MPSC update Sarkarnama
प्रशासन

MPSC update : 'एमपीएससी'ची प्रक्रिया होणार वेगवान; 3 सदस्यांच्या नियुक्तीला मुहूर्त मिळाला

New Appointments in MPSC : मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील रिक्त सदस्य पदावर तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून राजीव निवतकर, डॉ. दिलीप भुजबळ-पाटील आणि महेंद्र वारभुवन यांची एमपीएससीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Jagdish Patil

Pune News, 02 Jul : मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील रिक्त सदस्य पदावर तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून राजीव निवतकर, डॉ. दिलीप भुजबळ-पाटील आणि महेंद्र वारभुवन यांची एमपीएससीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्त्यांमुळे आयोगाच्या कामकाजाला गती मिळेल अशी अपेक्षा एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांकडून व्यक्त केली जात आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात.

मात्र, आयोगातील सदस्यांच्या रिक्त पदांमुळे MPSC च्या मुलाखती, निकालाच्या प्रक्रियेसह अनेक कामांसाठी विलंब होत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांकडून ही रिक्त पदे भरण्याची मागणी केली जात होती. आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्यांची पदे मंजूर आहेत.

यापैकी रिक्त असलेली 3 पदे भरल्यामुळे आता ही सदस्य संख्या सहा झाली आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला असून सहसचिव गीता कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राजीव निवतकर आणि महेंद्र वारभुवन यांची एमपीएससीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी नवी मुंबईतील आयोगाच्या मुख्यालयात सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ यांनी त्यांना शपथ दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT