MPSC postpones Combined Prelims Exam to 9 November 2025 due to heavy rainfall in Maharashtra. Sarkarnama
प्रशासन

MPSC Exam News : लोकसेवा आयोगाच्या डोळ्यांना अतिवृष्टी दिसली : अखेर MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलली; लगोलग नवी तारीखही जाहीर

MPSC Exam News :अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २८ सप्टेंबर रोजी होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली असून, आता ही परीक्षा ९ नोव्हेंबरला होणार आहे.

Hrishikesh Nalagune

MPSC News : अखेर राज्यातील अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. अतिवृष्टी व महापुराच्या पाण्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आणि परीक्षा केंद्रांवर पोहचण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी आयोगाने परीक्षा कधी होणार याची नवी तारीखही जाहीर केली आहे. यापूर्वी 28 सप्टेंबरला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा आता 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 28 सप्टेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांसह पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून केली जात होती. पण आयोगाने या मागणीकडे कानाडोळा करून परीक्षा नियोजित तारखेलाच होईल असे स्पष्ट करत परीक्षेच्या पार्श्वभूमीवर Code And Conduct बाबतचे एक परिपत्रक जाहीर केले होते. पण अखेर आयोगाच्या डोळ्यांना अतिवृष्टी दिसली आहे.

परीक्षार्थींच्या आग्रही मागणीनंतर आयोगाने X हॅन्डेलवर परीक्षा पुढे ढकलत असल्याची घोषणा केली. "जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ -दिनांक २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत" अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे.

मराठवाड्यात आणखी पावसाचा इशारा :

आधीच पावसाने झोडपलेल्या मराठवाड्याला पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आधीच्याच पावसामुळे परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना अभ्यासाला वेळ मिळावा यासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी करण्यात येत होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT