Sameer Wankhede Nawab Malik sarkarnama
प्रशासन

नवाब मलिकांच्या गंभीर आरोपांवर NCBचे वानखेडे म्हणाले..

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषद घेऊन जावई समीर खानच्या अटक प्रकरणावरुन समीर वानखेडेंवर हल्लाबोल केला आहे. याबाबत समीर वानखेडेंनी (Sameer Wankhede) प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एनसीबीवर गंभीर आरोप केले. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना काही कागदपत्रांचे पुरावे दाखविले. यावेळी मलिकांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केला. मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन जावई समीर खानच्या अटक प्रकरणावरुन समीर वानखेडेंवर हल्लाबोल केला आहे. याबाबत समीर वानखेडेंनी (Sameer Wankhede) प्रतिक्रिया दिली आहे.

नवाब मलिक यांनी यापुर्वीही अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंच्या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. आर्यन खानला बनावट केसमध्ये अटक करण्यात आले असल्याचा आरोप नवाब मलिकांनी दोन दिवसापूर्वी केला होता. आपल्या जावायालाही एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणात अडकविण्यात प्रयत्न केला, असे मलिक यांनी सांगितले. याबाबत समीर वानखेडेंना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, '' नवाब मलिकांना जे काही करायचे आहे ती त्यांची इच्छा आहे.''

कोर्टाचा आदेश आला असून यात 200 किलो गांजा सापडला नाही, तर एका महिलेकडे साडेसात ग्राम गांजा सापडला आहे.बाकीचे हर्बल तंबाखू आहे. मग NCB एवढी मोठी एजन्सी आहे, तिला तंबाखू आणि गांजा मध्ये फरक समजत नाही, असा टोला मलिक यांनी एनसीबीला लगावला. ''ता. 3 जानेवारी माझ्या जावयाला अटक झाली. तेव्हा मी म्हणालो होतो कायद्या अन् न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. पण भाजप नेते सगळ्या चॅनेल वर सांगत होते नवाब मलिक यांचा जावई ड्रग डीलर आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी पण आरोप केले. पण 27 तारखेला NDPS च्या स्पेशल कोर्टाने माझा जावई समीर खान आणि इतर दोन आरोपींना जामीन दिला. कोर्ट ऑर्डर मध्ये माझं नाव घेऊन बातम्या चालल्या. माझ्या जावायाबाबत बातम्या पेरण्यात आल्या. माझी मुलगी तिच्या दोन्ही मुलांवर त्याचा परिणाम झाला. मुलं समाजात बाहेर जायला तयार नव्हती, असे मलिक यांनी स्पष्ट केलं.

पंकजा मुंडे दोन वर्षात साचलेल्या कोणत्या गोष्टींवर उद्या बोलणार!

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) उद्याच्या दसरा मेळाव्यात ( dasara melava) काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सध्या सुरु आहे. गेल्या वर्षी हा मेळावा ऑनलाइन झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता. मात्र, आता यंदा हा मेळावा जाहीररित्या होत असल्याने या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लॉकडाऊन पूर्णतः शिथिल झालेलं आहे. सभांना परवानगी देण्यात आली आहे. ''मागच्या दोन वर्षांमध्ये ज्या काही घटना घडल्या संघर्ष यश-अपयश या संदर्भात मी दसरा मेळाव्यात बोलणार आहे, '' असल्याचे पंकजा मुंडे (bjp leader pankaja munde) सांगत आहेत. या संदर्भात त्यांनी एक व्हिडीओ त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT