Narendra Modi sarkarnama
प्रशासन

Central Government : केंद्र सरकारची मोठी कारवाई! IAS अधिकाऱ्याची हकालपट्टी, मोठं कारण आलं समोर

Central government removes senior IAS officer : केंद्र सरकारने एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्याला पदावरून हटवत नवीन अधिकाऱ्याकडे जबाबदारी सोपवली आहे. या निर्णयामागील कारणे, प्रशासनातील बदल आणि संपूर्ण घडामोडी जाणून घ्या.

Rashmi Mane

देशभरात परीक्षा व्यवस्थेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयात महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले असून, त्यांच्या जागी राजस्थान कॅडरचे वरिष्ठ IAS अधिकारी नरेश पाल गंगवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलामुळे शिक्षण मंत्रालयातील प्रशासकीय घडामोडींना वेग आला आहे.

NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांमुळे देशभरात विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, जबाबदारी आणि विश्वासार्हता याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि विविध विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत परीक्षा प्रणालीत तातडीने सुधारणा करण्याची भूमिका घेतली आहे.

कोण आहेत नरेश पाल गंगवार?

या वाढत्या दबावाच्या काळात केंद्र सरकारने उच्च शिक्षण विभागात नेतृत्व बदलण्याचा निर्णय घेतला. विनीत जोशी यांची बदली करून त्यांना पंचायती राज मंत्रालयात नियुक्त करण्यात आले आहे. तर, 1994 बॅचचे राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी नरेश पाल गंगवार यांच्यावर उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नरेश पाल गंगवार हे अनुभवी प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी IIT Delhi तसेच रुडकी विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. यापूर्वी त्यांनी पर्यावरण मंत्रालय आणि पशुपालन व डेअरी मंत्रालयात सचिव म्हणून महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. विविध मंत्रालयांतील त्यांच्या अनुभवाचा फायदा आता शिक्षण क्षेत्रात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सध्या देशातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याची भावना अनेक विद्यार्थी आणि पालकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणे, गैरप्रकारांना आळा घालणे, विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवणे आणि शिक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम बनवणे ही नवे सचिव नरेश पाल गंगवार यांच्यासमोरील सर्वात मोठी जबाबदारी असणार आहे. या नियुक्तीनंतर केंद्र सरकार परीक्षा व्यवस्थेत कोणते बदल करते आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT