New Labour Law Update : Sarkarnama
प्रशासन

New Labour Code: आता वाया जाणार नाहीत तुमच्या सुट्ट्या; नवीन कायद्यामुळे शिल्लक रजेचे दरवर्षी मिळणार पैसे

New Labour Code leave encashment rule 2025: नवीन लेबर कोडनुसार आता शिल्लक राहिलेल्या रजेचे दरवर्षी पैसे मिळणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा हा निर्णय आहे.

Mangesh Mahale

Leave encashment new labour law benefits employees: नवीन कामगार कायद्यामुळे (Labour Code 2025)कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. नवीन कामगार कायद्यामुळे कामगारांच्या शिल्लक रजा आता वाया जाणार नाहीत. कर्मचाऱ्यांना दरवर्षी त्यांच्या अतिरिक्त रजेचे पैसे म्हणजेच लिव्ह एनकॅशमेंट मिळवता येतील.

रजेसाठी पात्र होण्याची मर्यादा 240 दिवसांवरून 180 दिवसांवर आणलीय. जर मालकानं रजा नाकारली, तर ती रद्द न होता पुढच्या वर्षीसाठी जोडली जाईल. 18 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कामगारांना याचा प्रामुख्यानं फायदा होईल.

अर्जित रजेसाठी पात्र होण्याकरिता कर्मचाऱ्यांना आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. जुन्या कारखाना कायद्यानुसार 240 दिवस सलग काम करणे अनिवार्य होते. नवीन कामगार संहितेने ही मर्यादा केवळ 180 दिवसांपर्यंत (अंदाजे सहा महिने) कमी केली आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने एका कॅलेंडर वर्षात सलग 180 दिवस सेवा केली असेल, तर तो पगारी रजेसाठी पात्र आहे.

नवा कायदा काय आहे?

  1. शिल्लक रजेसाठी निवृत्तीची वाट पाहायला नको, दरवर्षी पैसे मिळणार

  2. रजेसाठी पात्र होण्यासाठी 240 ऐवजी केवळ 180 दिवस काम करणे आता पुरेसं आहे.

  3. रजा नाकारल्यास ती वाया जाणार नाही तर पुढील वर्षींच्या रजेत जोडली जाणार आहे.

  4. कर्मचारी 30 दिवसांची रजा पुढील वर्षांसाठी साठवून ठेवू शकतात.

  5. १८ हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कामगारांना याचा लाभ मिळणार आहे.

कुणाला फायदा होईल?

  • नवीन कामगार संहिता ही प्रामुख्याने अशा कामगारांसाठी तयार केले आहे जे शारीरिक, अकुशल, कुशल, तांत्रिक, परिचालन किंवा लिपिकीय कामे करतात आणि ज्यांचा मासिक पगार ₹18,000 पेक्षा कमी आहे.

  • जर एखादा कर्मचारी दरमहा ₹18,000 पेक्षा जास्त कमावणारा पर्यवेक्षक असेल, किंवा व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय पदावर असेल, तर त्यांना या संहितेअंतर्गत हे विशिष्ट फायदे मिळणार नाहीत.

  • अनेक राज्यांनी अद्याप या नवीन कामगार संहिता अधिसूचित केलेल्या नाहीत. त्यामुळे, जोपर्यंत तुमच्या राज्यात त्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत तुमची कंपनी जुन्या नियमांनुसार कार्यरत राहू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT