Fletcher Patel, Jasmine Wankhede, Sameer Wankhede sarkarnama
प्रशासन

'लेडी डॅान' कोण? फ्लेचर पटेलांनी नवाब मलिकांना दिलं उत्तर

फ्लेचर पटेल (Fletcher Patel) आणि त्याची लेडी डॉन (Ledy Don) हे दोघे कोण आहेत, फ्लेचर पटेल आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यात काय संबंध आहेत?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुन्हा एनसीबीवर (NCB) गंभीर आरोप केले. ''मी आर्यन खानला अटक केल्यानंतर दोन आरोपी कसे हँडल करताय प्रश्न विचारले होते ? एससीबी कार्यालयात जातात कसे याबाबत प्रश्न विचारल्यानंतर एनसीबीने त्याबाबत खुलासा केला होता. फ्लेचर पटेल कोण आहेत? त्यांच्यासोबत झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंचा काय संबंध आहे?'' असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. मलिक याच्या या आरोपाला फ्लेचर पटेल यांनी उत्तर दिलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

फ्लेचर पटेल (Fletcher Patel) म्हणाले, ''मी एक माजी सैनिक असून समीर वानखेडे हे (Sameer Wankhede) मोठे व्यक्ती असून त्यांचे चांगले काम आहे. सैनिक फेडरेशन मुंबईचा अध्यक्ष म्हणून मी वानखेडे आणि एनसीबीला मदत करीत असतो. काही जण देशात ड्रग्ज विक्री करीत आहेत. त्यामुळे तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यांना रोखण्यासाठी मी एनसीबीला मदत करत असतो. समीर वानखेडे यांना मीच नाही तर संपूर्ण देश ओळखतो. त्या फोटोमध्ये जे लेडी डॅान आहेत. त्या मोठ्या सामाजिक कार्यकर्ता आहेत. म्हणून त्यांना आदराने 'लेडी डॅान' म्हणतो. त्यांनी कोरोना काळात महत्वाची भूमिका बजावली होती. त्या समीर वानखेडेंच्या थोरल्या भगिनी अँड. जास्मिन वानखेडे आहेत.''

समीर वानखेडे यांच्याविषयी गुन्हेगारांमध्ये दहशत असली पाहिजे. मी देशासाठी काम करीत राहणार, मी कुणाला घाबरत नाही, माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी ते आरोप सिद्ध करावेत, असे फ्लेचर पटेल यांनी सांगितले.

फ्लेचर पटेल (Fletcher Patel) आणि त्याची लेडी डॉन (Ledy Don) हे दोघे कोण आहेत, फ्लेचर पटेल आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यात काय संबंध आहेत? तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे? फॅमिली फ्रेंडला पंच म्हणून घेण्यामागचा वानखेडेंचा हेतू काय? असे सवाल करत अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीवर पत्रकार परिषदेत पुन्हा निशाणा साधला आहे. यासह नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्वीटरवर फ्लेचर पटेल आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोसह त्यांनी एनसीबीसमोर (NCB) अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT