Public Transport news : महाराष्ट्र राज्य मार्ग व परिवहन महामंडळ म्हणजे एसटी महामंडळाने प्रवाशांना आनंदाची बातमी दिली आहे. येत्या 1 जुलैपासून आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी ही घोषणा केली. या योजनेसाठी काही अटीही घालण्यात आल्या आहेत.
एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या म्हणजेच 150 किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पुर्ण तिकीट धारी प्रवाशांनाच ही सवलत मिळणार आहे. कोणतीही सवलत घेत असलेल्या प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार नाही. त्याचप्रमाणए ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीच्या गर्दीच्या हंगामात सुरू असणार नाही.
योजनेची सुरुवात 1 जुलैपासून करण्यात येणार आहे. अधिकाधिक प्रवाशांना या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले आहे. त्यांनी 1 जूनला एसटीच्या वर्धापनदिनी या योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी लागू करण्यात येत आहे. पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच ही योजना लागू असेल, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.
येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाईल. मात्र, जादा बसेस साठी ही सवलत लागू नसेल. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमधील पुर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर किंवा public.msrtcors.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा MSRTC Bus Reservation या मोबाईल ॲपद्वारे तिकीट आरक्षित करता येईल. ऑनलाईन माध्यमातूनही 15 टक्के सवलत मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.