Tukaram Mundhe News
Tukaram Mundhe News Sarkarnama
प्रशासन

Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंच्या बदलीची 'ही' आहेत खरी कारणं

Dattatrya Deshmukh

Tukaram Mundhe News : आरोग्य संस्थांना अचानक भेटी, मुख्यालयी न राहणाऱ्यांना वेतनकपात व घरभाडे कपातीच्या नोटीसा, २४ तास ड्युटी करा, इंटर्नशिप करणाऱ्यांनीही ड्युटी करावी लागेल, अशी शिस्त घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि राज्यभरात 'कोव्हीड' उपाय योजनाच्या निधीतून खरेदीच्या नावाखाली उधळपट्टी करण्याच्या प्रकारची चौकशी लावणाऱ्या आरोग्य अभियान आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची दोनच महिन्यात बदली झाली.

'सरकारनामा'ने याबाबत गेल्या आठवड्यात ता. 19 रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. तुकाराम मुंडे यांना डॉक्टर-कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. खात्यांतर्गत राजकीय वर्तुळातही त्यांच्याबद्दल रोष टोकाला गेल्याने त्यांच्या बदलीच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी असलेले मुंढे जिल्ह्यातील ताडसोन्ना येथील रहिवाशी आहेत. शिस्तीचे अधिकारी अशी त्यांची प्रशासनात ख्याती आहे. त्यांच्या शिस्तीच्या बडग्यामुळे प्रशासन ताळावर येते आणि संबंधीत खात्याचा लाभ तळागळापर्यंत पोचतो.

मात्र, त्यामुळे मग मुंढे स्थानिक सत्ताधाऱ्यांपासून खात्यालाही ते नकोसे होतात असा पुर्वानुभव आहे. त्याचाच प्रत्यय आरोग्य विभागात आला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मागच्या महायुती सरकारमध्ये आरोग्य मंत्री म्हणून काम केल्याने त्यांना या खात्याबद्दल अधिक कनवळा आहे. तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी खात्याची आरोग्य सेवा सामान्यांपर्यंत पोचविल या भावनेने त्यांची आरोग्य अभियान आयुक्त म्हणून नेमणूक केल्याची माहिती आहे.

मात्र, रुजू होताच तुकाराम मुंढे यांनी अगोदर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त लावण्याचे काम हाती घेतले. यासाठी रात्रीच्या वेळी अचानक आरोग्य संस्थांना भेटीचे सत्र सुरु झाले. प्रतिनियुक्त्या बंद करा असे एक ना अनेक आदेश त्यांनी दिले. त्यामुळे उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्या आणि कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्राला सोयीनुसार चक्कर मारणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती.

अधिकाऱ्यांच्या संघटनांनी मुंढेंच्या निर्णयांना विरोधासाठी काळ्या फिती, सोशल मिडीयावर (Social Media) मतमतांतरे सुरु केली होती. दरम्यान, खात्यात मंत्र्यांनाही तुकाराम मुंढे नको वाटू लागले. मुंढे यांनी आरोग्य विभागातील अनेक अनियमिततांची चौकशी लावल्याने वरिष्ठ अधिकऱ्यांची लॉबी एकवटली होती. कोव्हीड संसर्ग आजाराच्या काळात राज्यभर खरेदीच्या नावाखाली कोट्यावढी रुयांची उधळपट्टी करण्यात आली. बाजारभावपेक्षा दहापट किमतीला वस्तू आणि अनावश्यक वस्तूंच्या खरेदीत कोट्यावढी रुपये खरच करण्यात, आल्याचा आरोप होतो. राज्यभर असे प्रकार घडले आहेत. तुकाराम मुंढे रुजू होताच त्यांनी हा विषय एजेंड्यावर घेत चौकशा लावल्या होत्या.

अनेक ठिकाणी चौकशांमध्ये अधिकारी दोषी आढळले, असल्याची माहिती आहे. त्यामुळे या अहवालवर मुंढे कारवाया करणार याची धास्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागली होती. त्यामुळे राज्यभरातील लॉबी एकवटली होती. दरम्यान, मुंढे असतील तर तुमची मर्जी पूर्ण करण्यात अडचणी येतील असे या लॉबीने मंत्र्यांना पटवून दिल्याची चर्चा आहे. तसे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जवळचे आहेत. त्यामुळे सावंत यांनी मुंढे यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रतिष्ठा पणाला लावल्याची चर्चा आहे. अखेर तुकाराम मुंडे यांची दोनच महिन्यात बदली झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT