IAS Officer’s Sudden Resignation Sparks Buzz: उत्तर प्रदेशातील प्रशासनात मोठी खळबळ माजवून देणारी घटना घडली आहे. आयएएस अधिकारी रिंकु सिहं राही यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिंह यांना भ्रष्टाचारविरोधी कठोर भूमिका घेणारे आणि धाडसी अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्यांच्या या निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रिंकू सिंह राही हे 2022 बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी होते. 2025 मध्ये शाहजहांपूर येथे एसडीएम म्हणून काम करत असताना त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ते वकिलांसमोर उठाबशा करताना दिसले होते. या घटनेनंतर त्यांना जुलै 2025 पासून महसूल परिषदेवर अटॅच करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना कोणतीही महत्त्वाची पोस्टिंग देण्यात आली नव्हती.
राजीनाम्यात राही यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांना बराच काळ कोणतेही काम देण्यात आले नाही आणि केवळ नावापुरते पदावर ठेवण्यात आले. पगार मिळत असला तरी जनतेसाठी काम करण्याची संधी नाकारली गेली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे हा निर्णय नैतिक जबाबदारी म्हणून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
राही यांचा कारकिर्दीचा प्रवास अत्यंत धाडसी राहिला आहे. 2009 मध्ये त्यांनी एक मोठा घोटाळा उघडकीस आणला होता. या प्रकरणानंतर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि त्यांना 7 गोळ्या लागल्या होत्या. तरीही त्यांनी मृत्यूवर मात करत पुन्हा उभारी घेतली. त्यामुळे ते एक निर्भीड आणि लढाऊ अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले.
शाहजहांपूरमधील घटनेत त्यांनी सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांना शिक्षा म्हणून उठाबशा करण्यास सांगितले होते. मात्र, त्या व्यक्तींपैकी एक वकिलाचा सहायक असल्याचे समजताच वकील संतप्त झाले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून राही स्वतः आंदोलनस्थळी गेले आणि त्यांनी स्वतःच उठाबशा करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.