प्रशासन

UPSC News : 'युपीएससी'च्या मुलाखतीत SC, ST,OBC उमेदांसोबत भेदभाव?; केंद्रीय मंत्र्यांनी सगळा डाव विरोधकांवर पलटवला

UPSC Interview Confusion Ends : IAS-IPS बनू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी माहिती! केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केलं की UPSC मुलाखत प्रक्रिया... सविस्तर माहिती जाणून घ्या.

Rashmi Mane

लोक सेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेचे इंटरव्ह्यू लवकरच सुरू होणार आहेत. याआधी इंटरव्ह्यू प्रक्रियेवर काही राजकीय नेत्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. विशेषतः ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना जाणीवपूर्वक कमी गुण देऊन त्यांची अंतिम रँकिंग घसरवली जाते का, असा आरोप करण्यात येत होता. या सर्व चर्चांवर केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत स्पष्ट केले की यूपीएससीच्या मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा भेदभाव होत नाही. त्यांनी सांगितले की ही प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक आणि बायसपासून मुक्त आहे.

मंत्र्यांनी माहिती दिली की इंटरव्यू सुरू होण्यापूर्वी उमेदवारांची निवड पूर्णपणे रँडम पद्धतीने केली जाते. इंटरव्यू बोर्डातील सदस्यांना उमेदवारांची जात, श्रेणी (General, OBC, SC, ST) किंवा त्यांनी लिखित परीक्षेत मिळवलेले गुण याबद्दल कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे मुलाखतीदरम्यान कोणत्याही प्रकारचा जाणूनबुजून किंवा नकळत होणारा भेदभाव आपोआप थांबतो.

याशिवाय, उमेदवारांनाही इंटरव्यू बोर्डातील सदस्य कोण आहेत, हे माहिती दिले जात नाही. या गोष्टीमुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक राहते आणि निकालावर कोणाचाही वैयक्तिक प्रभाव पडत नाही.

राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नात असा आरोप करण्यात आला होता की ओबीसी, एससी आणि एसटी वर्गाच्या उमेदवारांना, जनरल श्रेणीइतकेच लिखित गुण मिळूनही, मुलाखतीत कमी गुण दिले जातात. यामुळे त्यांच्या अंतिम रँकिंगवर परिणाम होतो. या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. सिंह यांनी स्पष्ट केले की असे आरोप पूर्णपणे निराधार आहेत आणि यूपीएससीची मुलाखत प्रणाली भेदभाव होत नाही.

मंत्र्यांनी पुढे सांगितले की पारदर्शकतेसाठी UPSC दरवर्षी सर्व शिफारस केलेल्या उमेदवारांचे लिहित परीक्षेतील, मुलाखतीतील आणि एकूण गुण आपल्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करते. यामुळे उमेदवार, पालक आणि तज्ञ मंडळी कोणताही संशय न बाळगता निकालाचे विश्लेषण करू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT