Voter List  Sarkarnama
प्रशासन

Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रांमध्ये पुणे अव्वलस्थानी; चिंचवड सर्वात मोठा मतदारसंघ

Central Election Commission Maharashtra Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल २०४ मतदान केंद्रांची नव्याने भर पडली आहे. पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण ८४१७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Pune News: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार पुणे जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांसह सर्वच मतदारांची विधानसभानिहाय प्रारूप मतदारयादी जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केली.

जिल्ह्यातील विधानसभानिहाय मतदारांची संख्या निश्‍चित झाली आहे. पुणे शहरातील कसबा पेठ हा सर्वात लहान विधानसभा मतदारसंघ ठरला आहे.चिंचवड विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात सर्वात मोठा मतदारसंघ ठरला आहे. चिंचवडमध्ये मतदारांची संख्या ही ६ लाख २७ हजार ४३७ इतकी झाली आहे.

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना याच कालावधीत मतदार यादीत नाव नोंदणीसाठीचा अर्ज नमुना क्रमांक ६, नाव समाविष्ट करण्यास हरकत, यादीत यापूर्वीच समाविष्ट असलेले नाव वगळणे, स्थलांतर झाल्यामुळे नाव वगळणे आदींसाठी नमुना क्रमांक. ७, पत्ता बदल, तपशिलात दुरुस्ती, दुबार इपीक कार्ड मिळणे आदींसाठी नमुना क्रमांक . ८ हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरता येणार असल्याचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी सांगितले. येत्या २० ऑगस्टपर्यंत प्रारूप मतदार यादीवर नागरिक आणि मतदारांना दावे व हरकती सादर करता येणार आहेत.

मतदान केंद्रांमध्ये पुणे अव्वलस्थानी

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल २०४ मतदान केंद्रांची नव्याने भर पडली आहे. पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण ८४१७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. ही संख्या राज्यात सर्वाधिक असल्याने मतदान केंद्रांमध्ये पुणे हे अव्वलस्थानी पोहोचले आहे. पुण्याखालोखाल मुंबई उपनगर, ठाणे आणि नागपूर जिल्ह्यात मतदान केंद्रे आहेत.

  1. पुणे व पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ८४ लाख ३९ हजार ७२९ इतकी झाली आहे.

  2. एकूण मतदारांमध्ये ४४ लाख ३ हजार ३४४ पुरुष, ४० लाख ३५ हजार ६४० महिला आणि ७४५ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यातील विधानसभानिहाय मतदारसंख्या

  • वडगाव शेरी: ४ लाख ७६ हजार ५३८

  • शिवाजीनगर : २ लाख ८१ हजार ८३१

  • कोथरूड : ४ लाख २१ हजार ७९

  • खडकवासला :५ लाख ४५ हजार ८९३

  • पर्वती : ३ लाख ४४ हजार ७३९

  • हडपसर: ५ लाख ९० हजार ६११

  • पुणे कॅन्टोन्मेंट : २ लाख ८६ हजार ५१८

  • कसबा पेठ : २ लाख ७८ हजार ६०६

  • चिंचवड : ६ लाख २७ हजार ४३७

  • पिंपरी : ३ लाख ७७ हजार २५१

  • भोसरी :५ लाख ५८ हजार ९५९

  • बारामती : ३ लाख ७१ हजार ५७७

  • पुरंदर : ४ लाख ३६ हजार ४१४

  • भोर : ४ लाख १२ हजार ४१४

  • मावळ: ३ लाख ७५ हजार ७७०

  • जुन्नर : ३ लाख १४ हजार ८३९

  • आंबेगाव : ३ लाख ४ हजार २६६

  • खेड :३ लाख ५७ हजार १०५

  • शिरूर : ४ लाख ४५ हजार ३००

  • दौंड : ३ लाख ७ हजार ४२

  • इंदापूर : ३ लाख २५ हजार ५४०

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT