Vivek Phansalakar
Vivek Phansalakar  Sarkarnama
प्रशासन

पांडे ऐन धुमाळीत निवृत्त : ठाकरेंनी फणसाळकरांना मुंबईचे पोलिस आयुक्त नेमले

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबईचे पोलिस (Mumbai Police) आयुक्त पदी आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले फणसाळकर हे 30 जून रोजी पदाचा कार्यभार स्वीकारतील.

ठाण्याच्या (Thane) पोलिस आयुक्तपदी असताना फणसाळकर यांची पदोन्नती करत महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची मे २०२१ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या खांद्यावर मुंबईकरांच्या सुरक्षेची धुरा देण्यात आली आहे. (Vivek Phansalkar Latest Marathi News)

मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) उद्या निवृत्त होणार आहेत. राज्यात ठाकरे सरकारवर संकट घोंघावत असताना मुंबईतील रस्त्यांवरही संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे. या परिस्थितीत मुंबईचे पोलिस आयुक्त रिक्त ठेवणे योग्य नव्हते. त्यामुळे सरकारने फणसाळकर यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला.

महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार आयपीएस अर्चना त्यागी यांच्याकडे देण्यात आला आहे. ठाणे येथील आयुक्तपदाच्या काळात उत्तम कामगिरी आणि कोरोना काळात त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी वर्गाने चांगल्या तर्हेने हाताळलेली होती.

ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाची परिस्थिती लक्षात घेता, राज्य सरकारने त्यांची बदली न करता मुदतवाढ दिली होती. सुमारे पावणे तीन वर्ष त्यांनी ठाणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभळला होता. कोरोना (Corona) काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT