chandrakant patil Latest News  sarkarnama
पुणे

२०२४ मध्ये 'शत प्रतिशत' भाजप की शिंदे सरकार? चंद्रकांतदादा म्हणतात, काळ ठरवेल...

Chandrakant Patil : 'सकाळ' माध्यम समूहाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : महाराष्ट्राच्या सत्ता स्थानावरून शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना खाली खेचल्यानंतर भारतीय जनता पक्ष (BJP) आणि शिंदे गटाची युती किती अभेद राहील. पुढच्या निवडणुकांमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसला सत्तेपाशी फिरू देणार नाही, असे आजवर सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात होते. पण 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गट एकत्र राहणार का ते निवडणुकांना एकत्रित सामोरे जाणार का? या प्रश्नाचं उत्तर आज घडीला भाजपकडे नाही.

त्याचं कारण पुढच्या निवडणुका एकत्र लढणार का? या कळीच्या प्रश्नावर भाजपचे बडे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणतात की, याबाबतचा फैसला काळ ठरवेल, अर्थात पुढच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गट एकत्रित निवडणुका लढण्याची शक्यता कमी असल्याचे पाटील यांच्या खुलासावरून दिसून आले आहे. 'सकाळ' माध्यम समूहाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पाटलांनी याबाबतचा खुलासा केला आहे. (Chandrakant patil Latest News )

पाटील यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक मुद्यावर सडेतोड उत्तरे दिली. यामध्ये शौक्षणिक धोरण, रोजगार, शिक्षण बजेट, विद्यापीठांचे नामकरण, यु जी सी याबद्दल पुनर्रचना, सुरू असलेलं राजकारणं आणि इतर हलक्या-फुलक्या प्रश्वांचींही त्यांनी उत्तरे दिली.

मुलाखती दरम्यान विचारण्यात आलेले प्रश्न आणि पाटील यांनी दिलेली उत्तरे जशीच्या तशी...

प्रश्न: नॅशनल एज्युकेशन पॉलिसी चे भारतीयकरण पेक्षा भगवेकरण केले जाते आहे का?

चंद्रकांत पाटील : भारतीयकरण आणि भगवेकरण हे शब्द वेगळे नाहीत. भगवे ही देशाची परंपरा आहे. भगवा त्याग, समर्पण शिकवतो मात्र शिक्षणात भ्रष्टाचार सुरू आहे.

प्रश्न : शैक्षणिक धोरणाची अंबलबजावणी कधी?

चंद्रकांत पाटील : कोरोनामुळे हा विषय मागे राहिला. सगळीकडे आम्ही आग्रही आहोत की, शाळेला वर्ग लहान करता येतील का? मातृभाषा यावर मिळणारे शिक्षण, स्किल डेव्हलपमेंटवर भर दिला जाणार आहे.

प्रश्न : शिक्षक आणि प्राध्यापक यांच्यात बदल?

चंद्रकांत पाटील : प्राध्यापकांच्या ट्रेनिंगसाठी MSFDA ही एक संस्था पुण्यात सुरू झाली आहे. या ट्रेनिंग नंतर प्राध्यापकांना परीक्षा देण्यात येईल.

प्रश्न : पुण्यातून शिक्षण अजून पुढे जाणार का?

चंद्रकांत पाटील : ४२ लाख कॉलेज विद्यार्थी राज्यात आहे. enrollment रेशिओ आता ३२ तक्के आहे. पर्यंत हा ५० टक्के वर जाईल.

प्रश्न : मुक्त विद्यापिठ मधून डिग्री कॉर्पोरेटमध्ये स्थान नसते. यावर काय?

चंद्रकांत पाटील : कॉर्पोरेट डिग्रीकडे नाही तुम्हाला काय येते हे बघते. स्किल्स डेव्हलपमेंट ला पुढे वाव दिली जाईल.

प्रश्न : शिक्षण आणि रोजगार हे एकत्र होत आहेत?

चंद्रकांत पाटील : दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण रोजगार या दिशेने गाडी चालत गेली आहे. मात्र स्वतःची ओळख, समाधान, जीवनाचे उद्दिष्ट हे मागे गेले आहे. हे दोन्ही विषय एकत्र शिकवले गेले पाहिजे. आनंद पैसे कमावण्यात आणि निवडणूक जिंकण्यााठी नसते

प्रश्न : कुठल्याही मंत्र्याने उघडलेले खाजगी विद्यापीठ बद्दल दृष्टी?

चंद्रकांत पाटील : संस्थेच्या उभारणीनंतर त्यांनी फी कमी केली पाहिजे. गरीब विद्यार्थ्याला शिक्षण द्यायला हवे. पतंगराव कदम यांचे शिक्षण संस्थेला फी कमी करायला काय हरकत आहे. आता तुमच्या मोठ्या इमारती उभ्या झाल्या आहेत. मग त्यांनी एवढ्या फी घेतल्या पाहिजे का? शिक्षण स्वस्त झाले पाहिजे

प्रश्न : राज्य शिक्षणाला बजेट वाढवणार का?

चंद्रकांत पाटील : ६२ हजार कोटी शिक्षकांचे पगार होत आहेत. येत्या काही दिवसात बजेट वाढेल सुद्धा. केजी ते पीजी हे शिक्षण फुकट देण्यापेक्षा ज्यांना गरज आहे त्यांना मिळायला हवं. १७०० कोटी रुपये फी भरण्याची स्कॉलरशिप आपल्याकडे आहे.

प्रश्न : स्वायत्त विद्यापीठामुळे राज्य सरकार वर टीका होते आहे?

चंद्रकांत पाटील : प्रायव्हेट संस्थांनी शिक्षणाची वाटचाल पुढे नेली त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. त्यांनी आता सेवेचे माध्यम आहे. हे स्वीकारायला हवे. फी कमी नंतर बघू पण या कॉलेजने काहीतरी नवीन दिले पाहिजे. अत्ता ९ कॉलेजची यादी माझ्याकडे आहे स्वायत्त विद्यापिठ आम्हाला हवी आहे.

प्रश्न : येत्या काही दिवसात काही बदल?

चंद्रकांत पाटील : सगळ्या खाजगी विद्यापिठ यांचे एक फोरम घेणार आहे. त्यावेळी त्यांच्या अडचणी आणि आमचे मार्गदर्शन देखील होईल.

प्रश्न : विद्यापिठांचे नामकरण यासारखे अनेक विषय त्यांचा संघर्षाकडे कसे बघता?

चंद्रकांत पाटील : जगातील रँकिंग मध्ये भारतात जे टॉप चे विद्यापिठ असतील त्यातील ५ विद्यापिठ यांच्यावर लक्षं द्यायचे की त्यांनी आधी पुढे जायचे.

प्रश्न: यु.जी.सी याबद्दल पुनर्रचना?

चंद्रकांत पाटील : आज तरी आवश्यकता नाही. इंजिगीरींग, डॉक्टर साठी एक बॉडी लागणार आहे. फंडस् फक्त सोडले पाहिजेत

रॅपिड फायर प्रश्न...

प्रश्न : तांबडा, पांढरा का बाखरवडी?

पाटील : दोन्ही

प्रश्न : भाजप प्रदेशाध्यक्ष की मंत्री पद?

पाटील : पार्टी नेतृत्वसाठी प्रदेशाध्यक्ष

प्रश्न : शिंदे सेना की उद्धव सेना?

पाटील : भविष्यात काय होईल याचा अंदाज घेतला असता तर अत्ता शिंदे सेना.

प्रश्न : विश्वजीत कदम यांच्या बद्दल काय?

पाटील : विश्वजीत कदम भाजपमध्ये येण्याची शक्यता नाही.

प्रश्न : २०२४ मध्ये भाजप शत प्रतिशत का शिंदे सरकार ?

पाटील : काळ ठरवेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT