corona satara
corona satara Sarkarnama
पुणे

पुणे जिल्ह्यात एका दिवसात १० हजारांहून अधिक रूग्ण; पाच जणांना मृत्यू

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे-पिंपरी शहर आणि जिल्ह्यात शनिवारअखेर सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या ५५ हजार ९९७ इतकी झाली आहे. पैकी दोन हजार १४२ रुग्णांवर शहर व जिल्ह्यातील विविध रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. उर्वरित ५३ हजार ८५५ गृहविलगीकरणात आहेत. जिल्ह्यात एका दिवसात १० हजार २८१ रूग्ण सापडले आहेत.

पुणे शहरात शनिवारी पाच हजार ७०५ रूग्ण सापडले. पुणे-पिंपरी व जिल्ह्यात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी एका दिवसात दहा हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. हाच आकडा शुक्रवारी दहा हजार ७६ इतका होता. याउलट दिवसातील नवीन रुग्णांच्या तुलनेत निम्‍याहून कमी कोरोनामुक्त झाले आहेत. शिवाय मागील सहा महिन्यांच्या खंडानंतर शनिवारी पहिल्यांदाच कोरोनाने पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

दिवसातील जिल्ह्यातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक पाच हजार ७०५ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये दोन हजार ५४५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात एक हजार ४२४, नगरपालिका हद्दीत ४३२, कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १७५ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील दोन हजार ३३८, पिंपरी चिंचवडमधील एक हजार ७३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५७०, नगरपालिका हद्दीतील १५१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ६४ जण आहेत. दिवसातील एकूण कोरोना मृत्यूमध्ये पुणे शहरातील दोन आणि पिंपरी चिंचवड, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी एक मृत्यू आहे.

येत्या आठवडाभरात रूग्णसंख्येत घट अपेक्षित आहे. त्यासाठी पुणेकरांनी कोरोनाचे नियम पाळणे आवश्‍यक आहे.आकडे असेच वाढत राहिले तर पुढच्या आठवड्यात निर्बंध आणखी कडक करण्याचा इशारा पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या गेल्या चार दिवसात झपाट्याने वाढली आहे. बहुतांश रूग्णांना सर्दी, खोकला व ताप येत असला तरी संसर्गाचे प्रमाण मोठे आहे, त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज असल्याचे तज्ञांचे मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT