Govt job alert 2026 Sarkarnama
पुणे

Bank Jobs 2026 : 12 वी पास आहात? मग पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; भरतीबाबत शासनाचा मोठा निर्णय जारी!

12th Pass Government Jobs in Maharashtra : 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीची मोठी संधी. पात्रता, रिक्त पदे, अर्ज प्रक्रिया आणि शासनाच्या नव्या निर्णयाची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Sudesh Mitkar

Pune News : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत शासनाने मोठे बदल केले असून, आता ही भरती ऑनलाईन प्रक्रियेतून वगळण्यात आली आहे. या पदासाठी आता ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यास शासनाने मान्यता दिली असून, भरतीत स्थानिक उमेदवारांना १०० टक्के प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सहकार विभागातील अपर निबंधक संतोष पाटील यांनी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.

किमान शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण अनिवार्य

शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील शिपाई पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता निश्चित केली आहे. त्यानुसार, आता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान १२ वी उत्तीर्ण असणे अनिवार्य राहील. यापूर्वी सुरक्षा रक्षक, वाहनचालक या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसह नाबार्डच्या अहवालानुसार वरिष्ठ, मध्यम व कनिष्ठ व्यवस्थापनातील पदे आणि विशेष, तांत्रिक पदे ऑनलाईन भरती प्रक्रियेतून वगळण्यात आली होती. याच धर्तीवर आता शिपाई पदही ऑनलाईन प्रक्रियेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अनुचित प्रकार घडल्यास संचालक मंडळावर थेट कारवाई!

भरती प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी बँकांना आता बँक स्तरावरून उमेदवारांची ऑफलाईन पद्धतीने लेखी परीक्षा घेणे अनिवार्य राहील. ही परीक्षा बँकेला एखाद्या अनुभवी आणि तज्ज्ञ एजन्सीमार्फतच घ्यावी लागेल. परीक्षा प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार किंवा गैरव्यवहार घडणार नाही, याची संपूर्ण दक्षता घेण्याची जबाबदारी बँकेच्या संचालक मंडळावर सोपवण्यात आली आहे. जर या परीक्षा प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार किंवा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले, तर संबंधित बँकेच्या संचालक मंडळावर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही शासनाने दिला आहे.

जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना कधी संधी मिळणार?

या नव्या निर्णयानुसार स्थानिक उमेदवारांना पूर्ण प्राधान्य देण्यात आले आहे. जर एखाद्या वेळी या श्रेणीतील पदभरतीसाठी स्थानिक उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले नाहीत, तरच संबंधित बँकेला या जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांमधून भरण्याची मुभा देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT