17 MPs meets Sharad Pawar
17 MPs meets Sharad Pawar 
पुणे

चर्चेला उधाण; भाजपच्या ५ खासदारांसह १७ जणांनी घेतली शरद पवारांची भेट

सरकारनामा ब्युरो

बारामती: देशभरातील विविध पक्षांचे १७ खासदार आणि काही उद्योजक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांची भेट घेतली. यात भाजपचे (BJP) 5 तर इतर पक्षातील 12 खासदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा बारामतीतील विकास कामाच्या पाहणी (Development work) दौरा असल्याचे सांगितले जात असले तरी खासदारांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. (17 MPs meets Sharad Pawar in Baramati )

यामध्ये निशिकांत दुबे, दुष्यंत सिंग, शिवकुमार उदासी, सीएम रमेश या भाजप खासदारांचा समावेश आहे. तर लवू कृष्णा देवरियालू (युवजन श्रमिक), रितेश पांडे (बसपा), सौगता रॉय (तृणमूल काँग्रेस), विवेक गुप्ता (तृणमूल काँग्रेस) हे इतर चार खासदार आणि काही उद्योगतींचा समावेश आहे. हा विकास कामांच्या पाहणीचा दौरा असला तरी या दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

शरद पवार यांनी दिलेल्या आमंत्रणानंतर हे सर्वजण बारामतीत आल्याचे सांगण्यात येत आहे. बारामतीच्या नियोजनबद्ध विकास आराखड्याची आणि विविध विकास कामांची हे खासदार पाहणी करत आहेत. याशिवाय बारामतीतील विविध औद्योगिक कंपन्या, महिला सक्षमीकरण, कृषीविषयक प्रचार व प्रसार तंत्रज्ञान, शैक्षणिक विकास, साखर कारखाने अशा विविध बाबींची पाहणी हे खासदार करणार आहेत. आज सायंकाळपर्यंत हा पाहणी दौरा सुरु राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बारामतीतील विकास कामाची पाहणी करण्यात आलेल्या खासदारांमध्ये विविध पक्षाच्या खासदारांचा समावेश आहे. यामध्ये भाजपचे 5 तर विविध पक्षातील 12 खासदारांचा समावेश आहे. यावेळी या खासदारांनी बारामतीतल्या सर्व संस्थांना भेट देत केली विकासकामांची पाहणी केली.

दरम्यान आतापर्यंत या उपस्थित खासदारांनी आपल्या दौऱ्यात फेरेरो या आंतरराष्ट्रीय चॉकलेट कंपनीसह बारामतीत महिलांनी बांधलेल्या टेक्सटाइल पार्कला भेट दिली आहे. या भेटीची खास बाब म्हणजे स्वत: शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार हे तिघेही खासदारांसोबत उपस्थित राहत विविध विकास कामांची माहिती देताना दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT