पुणे विभागीय मंडळ सरकारनामा
पुणे

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेत २८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

दहावीच्या पुर्नपरीक्षेत तीन हजार ५३ उत्तीर्ण होऊ शकले आहेत.

सम्राट कदम : सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सप्टेंबर तसेच या महिन्याच्या सुरवातीला घेतलेल्या पुरवणी परीक्षेत दहावीच्या परीक्षेत २९.१४ टक्के तर बारावीच्या जुन्या अभासक्रमात २७.३१ टक्के आणि नव्या अभ्यासक्रमात २५.८७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १२ हजार ३६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १० हजार ४७७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. दहावीच्या पुर्नपरिक्षेत तीन हजार ५३ उत्तीर्ण होऊ शकले आहेत.

विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी २९.१४ आहे. एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण न होऊ शकलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या चार हजार ३३६ इतकी आहे. हे विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षात एटीकेटी सवलतीद्वारे इयत्ता ११ वी च्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

बारावीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी राज्यातून पुर्नपरिक्षार्थी म्हणून दोन हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक हजार ८०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जुन्या अभ्यासक्रमासाठी १२ हजार ५३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२ हजार १६० विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते.यापैकी तीन हजार ३२२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले आहेत.

दहावीची पुरवणी परीक्षा दृष्टीक्षेपात :

विभागीय मंडळ : उत्तीर्ण टक्केवारी

पुणे : २६.५२

नागपूर : ३९.९०

औरंगाबाद : ३१.६४

मुंबई : २०.७३

कोल्हापूर : २९.७२

अमरावती : ३९.५६

नाशिक : ४९.५४

लातूर : ३७.६९

कोकण : १८.४४

बारावीची पुरवणी परीक्षा दृष्टिक्षेपात :

नवीन अभ्यासक्रम

विभागीय मंडळ : उत्तीर्ण टक्केवारी

पुणे : २६.७२

नागपूर : २०.३५

औरंगाबाद : ३६

मुंबई : १५.०६

कोल्हापूर : २२.३६

अमरावती : ११.८२

नाशिक : ३०

लातूर : ३६.४९

कोकण : ०

जुना अभ्यासक्रम :

विभागीय मंडळ : उत्तीर्ण टक्केवारी

पुणे : २४.८९

नागपूर : ४०.४६

औरंगाबाद : ३९.८२

मुंबई : १९.५५

कोल्हापूर : २९.२८

अमरावती : ३८.४०

नाशिक : २८.९२

लातूर : ४७.१०

कोकण : १३.१५

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT