Voters in Chinchwad
Voters in Chinchwad Sarkarnama
पुणे

Pune by poll Election : सायंकाळी पाच वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 41.1 तर कसब्यात 45.25 टक्के मतदान

सरकारनामा ब्युरो

Kasba and Chinchwad news update : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज (दि.26 फेब्रुवारी) मतदान पार पडत आहे. आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र, कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीचे मतदान सकाळपासूनच अत्यंत संथगतीने सुरू होते. दुपारनंतर मात्र वेग वाढला. तर सायंकाळी मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला.

या निवडणुकीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 41.1 तर कसब्यात 45.25 टक्के मतदान झाले होते. दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत चिंचवडला 30.55 टक्के तर कसब्यात 30.5 टक्के मतदान झाले. दुपारी एक वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 20.68 टक्के तर कसब्यात केवळ 18.5 टक्के मतदान झाले होते. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत अर्थात मतदानाच्या पहिल्या दोन तासात 3.52 टक्के मतदान झाले. तर कसब्यात 6.5 टक्के मतदान झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान आज पार पडत आहे. मात्र, मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. दुपारी एकनंतर कसब्यातील मतदान वाढल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मतदानात पैशाचा आणि पोलीस यंत्रणांचा वापर भाजपकडून होत असल्याचा आरोप केला. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी सकाळी दगडूशेठ गणपतीची आरती करून मतदान केले. तर दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणुकीला गालबोट लागले.

दोन गटात धक्काबुक्की झाली. अपक्ष उमेदवार कलाटे आणि जगताप यांच्या समर्थकांमध्ये हा वाद झाला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे वाद मिटला आहे. त्यानंतर येथे पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे.

या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून संपूर्ण ताकदीने प्रचार करण्यात आला. दोन्ही बाजूंचे प्रमुख नेते या पोटनिवडणुकांसाठी पुण्यात ठाण मांडून होते. त्यामुळे कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुका चुरशीची होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT