Ajit Pawar Sarkarnama
पुणे

पिंपरीच्या धर्तीवर पुण्यात सलग ७५ तास लसीकरण मोहीम

शहरातील बहुतांशी पालकांची त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची मानसिकता झालेला नाही, असे शाळांनी पालकांकडून मागविलेल्या संमतिपत्रांच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे.

umesh ghongade

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग पुर्णपणे नियंत्रणात आला आहे. कोरोना लसीकरणाचा फायदा होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर पुणे शहर व जिल्ह्यात सलग ७५ तासाची (तीन दिवस तीन तीस) खास लसीकरण मोहीम राबविण्याची घोषणा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज केली. 75 hours continuous vaccination campaign in Pune on the lines of Pimpri)

पिंपरीत गेल्या दोन दिवसांपासून सलग ७५ तासांची लसीकरण मोहीम सुरू आहे. या माहिमेत शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत (३१ तास) साडेपाच हजार जणांचे लसीकरण झाले आहे. या धर्तीवर लसीकरण करण्यासाठी पुणे महापालिका व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला तयारी करण्यास सांगण्यात आल्याचे पालकमंत्री पवार यांनी सांगितले.

शहर व जिल्ह्यातील शाळा येत्या चार ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पालकांची त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची मानसिकता झाली आहे. मात्र, शहरातील बहुतांशी पालकांची त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची मानसिकता झालेला नाही, असे शाळांनी पालकांकडून मागविलेल्या संमतिपत्रांच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे, असे पवार यांनी सांगितले.

सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार शाळांनी पूर्ण पुर्वतयारी व नियोजन केले आहे. त्यांनी आपापल्या परीने काही शाळांनी आठवड्यातील तीन, काहींनी दोन तर, काहींनी पाच दिवस ऑफलाइन शाळेचे नियोजन केले आहे.दरम्यान, काही पालकांनी आता दिवाळी जवळ आली आहे. शाळांना दिवाळीची सुट्टी लागणार आहे. मग आता घाई कशाला, दिवाळीनंतर बघू, अशी बहुतांश पालकांची मानसिकता असल्याचे पवार यांनी सांगितले.

आता कोरोना संसर्ग कमी झाला आहे. लसीकरणही बऱ्यापैकी झाले आहे. त्यामुळे आता कोरोना संपला, या भ्रमात राहून कोरोना नियम पाळणे टाळू नका. कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे मास्कचा नियमित वापर, पुरेसे अंतर राखणे आणि सॅनिटायझरचा वापर आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री पवार यांनी पुणेकरांना केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT