World Economic Conference, Davos
World Economic Conference, Davos 
पुणे

World Economic Conference : मुख्यमंत्री शिंदेंनी दावोसमधून आणले 84 हजार कोटींचे प्रकल्प; पुण्याच्याही वाट्याला बरंच काही

सरकारनामा ब्युरो

World Economic Conference, Davos : दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेच्या महाराष्ट्रासाठी दोन दिवसांत तब्बल ८८ हजार ४२० कोटी रुपये गुंतवणूकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारपर्यंत विविध उद्योगांशी ४२ हजार ५२० कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार करण्यात आले. यासोबतच इतर प्रकल्पांशी संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात देखील चर्चा झाली.

जागतिक आर्थिक परिषदेत पुणे जिल्ह्यासह चंद्रपुर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे प्रकल्पांचे करार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातून हजारो रोजगार निर्माण होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट अॅटो सिस्टीम्सचा ४०० कोटी रुपयांचा प्लास्टीक ऑटोमोटीव्हज् प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातून दोन हजार जणांना रोजगार मिळणार आहे.

याशिवाय राज्यात विविध ठिकाणी गोगोरो इंजिनियरींग व बडवे इंजिनियरींगचा २० हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा अॅटो प्रकल्प उभारण्याच्या करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पातून राज्यभरात विविध ठिकणी ३० हजार जणांना नोकऱ्या मिळणार आहे.

तर, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनचा २० हजार कोटी रुपयांचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प उभारण्याचा करार करण्यात आला असून या प्रकल्पातून १५ हजार जणांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे.

तसेच, चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे इस्त्रायलच्या राजूरी स्टील्स अॅण्ड अलॉईजचा ६०० कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प उभारण्याबाबत करार करण्यात आला असून यातून १ हजार जणांना रोजगार मिळणार आहे.

याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे ब्रिटनच्या वरद फेरो अॅलाँईजचा १ हजार ५२० कोटींचा स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातून दोन हजार जणांना रोजगार मिळू शकतो.

या करारांशिवाय जपानच्या बँकेसोबत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र दालनात जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांच्यासोबत एक बैठक पार पडली.

या बैठकीत जपानी बँकेच्या सहकार्याने देशभरात ज्या अकरा औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत त्यात सुपा एमआयडीसी येथे इंडस्ट्रियल पार्कच्या याठिकाणी उत्तम प्रकारे वीज, पाणी आणि कनेक्टिव्हिटी देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याठिकाणी उद्योगांना अनुकूल असे वातावरण निर्माण केले असून येथील इंडस्ट्रियल पार्कच्या इकोसिस्टमवर देखील चर्चा झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT