सासवड : पुरंदर तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती (Pune District Bank Election) सहकारी संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व भाजप (Bjp) तसेच सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शांततेत मतदान केले. चार वाजेपर्यंत साधारण ९९ टक्के मतदान झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनल आहे. 'अ' वर्ग मधून आमदार संजय जगताप बिनविरोध झाले. तर 'ड' वर्ग मतदारसंघातून प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, सुरेश घुले, निर्मला जागडे व पूजा बुट्टे पाटील अशा चार उमेदवार रिंगणात आहेत. पुरंदर तालुक्यात २२३ मतदार आहेत. त्यातील दोन मयत आहेत. त्यामुळे २२१ पैकी २१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. साधारण ९९ टक्के मतदान झाले. 'अ' गटात ९५ 'ब' गटात ७, 'क' गटात ३९ व 'ड' गटात ८२ असे २२३ पेकी २१९ मतदान झाले.
प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सकाळीच मतदान केले. त्यानंतर आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, प्रवक्ते विजय कोलते, सुदाम इंगळे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप पोमण, नीरा मार्केट कमिटीचे माजी सभापती नंदूकाका जगताप, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, काँग्रेसच्या तालुका महिला अध्यक्षा सुनिता कोलते, राष्ट्रवादीच्या तालुका महिला अध्यक्षा गौरी कुंजीर, काँग्रेसचे राज्याचे सचिव गणेश जगताप, भैय्यासाहेब खाटपे, हेमंतकुमार माहुरकर, जितेंद्र निगडे, श्यामकांत भिंताडे, संजयनाना जगताप, अनिल उरवणे, ईश्वर बागमार, बाळासाहेब भिंताडे, बंडूकाका जगताप, विश्वास जगताप, संजय चव्हाण, योगेश फडतरे. तसेच भाजपच्या वतीने युवानेते बाबाराजे जाधवराव, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे, श्रीकांत थिटे, श्रीकांत ताम्हाणे आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.