Pune Jumbo Covid Centre Scam: Sarkarnama
पुणे

Pune Jumbo Covid Centre Scam: संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरसह चार जणांविरुध्द गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामा ब्युरो

Jambo Covid Center Scam : खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी नगर जंबो कोविड सेंटरचे कंत्राट घेण्यासाठी फसवणुकीच्या आरोपाखाली सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही या प्रकरणी १०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. (Jambo Covid Center Scam)

पीएमआरडीएचे कार्यकारी अभियंता राजू लक्ष्मण ठाणगे (वय ४७) यांनी फिर्याद दाखल केली आहे. यानुसार डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना काळात २६ ऑगस्ट २०२० ते ९ सप्टेंबर २०२० या हा घोटाळा केल्याची माहिती समोर आली आहे. (Covid 19 Scam)

शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात शहरात आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी विभागीय आयुक्तांनी युद्धपातळीवर कोविड रुग्णालय उभारणीसाठी मंजुरी दिली होती. यासाटी सुजीत पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटलला शिवाजीनगर येथील सीओईपी मैदानावर कोविड जंबो सेंटरची उभारणीचे आणि चालविण्याचे कंत्राट देण्यात आले. पण पाटकर यांनी जंबो कोविड सेंटरच्या निविदा प्रक्रियेत निवड होण्यासाठी बनावट पार्टनरशिपचा करारनामा सादर करत पीएमआरडीएची फसवणूक केली, असे राजू लक्ष्मण ठाणगे फिर्यादीत म्हटले आहे. (Sanjay Raut News)

आठशे बेडसाठी निश्चित केलेल्या कोविड रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय तज्ज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध नव्हते. रुग्णांना नाश्ता व जेवण वेळेत मिळत नसल्याची तक्रार महापालिकेकडे केल्या जात होत्या. मिळालेल्या तक्रारींच्या आधारे महापालिका आयुक्तांनी पाटकर यांच्या कोविड सेंटरला कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच, सेवेतील त्रुटींमुळे पीएमआरडीए कडून लाइफलाइन हॉस्पिटलची सेवा खंडित करण्यात आली. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पाटकर यांनी पीएमआरडीएला सादर केलेल्या भागीदारी पत्रांमध्ये तफावत असल्याचा आरोप केला आहे.

Edited By -Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT