Crime News , Vijay Mane
Crime News , Vijay Mane Sarkarnama
पुणे

काय सांगता! मुख्यमंत्री शिंदेंचे डुप्लिकेट मानेंवर गुन्हा दाखल, कारण ऐकूण व्हाल हैराण...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासारखा चेहरा दिसत असणारे आणि त्यांच्यासारखाच पेहराव परिधान करत डुप्लिकेट सीएम म्हणून ओळख मिरवत असलेले विजय माने यांच्यावर मुख्यमंत्री शिंदेंची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणयात आला आहे. माने यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये IPC 419-511, 469, 500, 501, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्यांना अटक झालेली नाही. (Crime News)

समाजात मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन करणे, त्यासोबतच डुप्लिकेट सीएम म्हणून वावरत असलेले विजय मानेंनी आरोपी शरद मोहोळ सोबत एक फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल देखील केला होता. तसेच मुख्यमंत्र्यांचा वेश परिधान करत अनेक ठिकाणी माने नाचले देखील होते. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, सत्तांतरानंतर मुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर माने यांनी शिंदे यांच्यासारखा चेहरा आणि दाढी असल्याने त्यांच्यासारखे कपडे घालून ते डुप्लिकेट सीएम म्हणून मिरवत होते. यामुळे ते लोकप्रिय देखील होत होते. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवामध्ये तर त्यांना आरतीसाठी देखील आमंत्रीत केलं जात होते.

याच लोकप्रियतेचा फायदा घेत मानेंनी मुख्यमंत्री शिंदेंची देखील भेट घेतली होती. मात्र, त्यांनी आरोपी मोहोळ सोबतचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल करणं असो किंवा त्यांच सार्वजनिक ठिकाणी नाचनं अंगलट आलं आहे. अखेर त्यांच्यावर मुख्यमंत्र्याची बदनामी केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT