PCMC BJP
PCMC BJP Sarkarnama
पुणे

पटोलेंच्या निषेधासाठी वेगळा मार्ग अवलंबावा लागेल; भाजपच्या या पैलवान आमदाराचा इशारा..

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारादरम्यान या महिन्याच्या १७ तारखेला कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) आपण मोदींना शिव्या देऊ शकतो,मारूही शकतो,असे अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचे पडसाद भाजपकडून (bjp) राज्यभर उमटले. त्यावेळी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपने पटोलेंच्या प्रतिमेला जोडे मारून आपला निषेध नोंदवला होता. हे वादळ शांत होतेय न होते तोच पटोलेंनी आठवडाभरात पुन्हा रविवारी (ता.२३ जानेवारी) नाशिक येथे ज्याची बायको पळते, त्याचे मोदी ठरतं, असं दुसरं आक्षेपार्ह विधान केले. त्यावर सोमवारी (ता.२४ जानेवारी) राज्यभरात भाजपकडून पटोलेंविरोधात पुन्हा तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. पिंपरी-चिंचवडमध्ये यावेळी पटोलेंच्या प्रतिमेला भाजपने काळे फासले.

केंद्रातील सत्ता गेल्याने आलेल्या निराशेतून पटोले अशी बेलगाम विधाने करीत असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) म्हणाले.पटोलेंचा निषेधासाठी आता वेगळा मार्ग अवलंबावा लागेल,असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आक्षेपार्ह वक्तव्य केल्यााप्रकरणी पटोलेंवर कडक कारवाईची मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली.स्वताला पुरोगामी समजणारे नेते आज इतक्या खालच्या थराला जाऊन सत्तेच्या हव्यासापोटी टीका करतील,असे स्वप्नातही वाटले नव्हते. पटोले व कॉंग्रेसच्या हातात असलेली केंद्रातील गेल्या कित्येक वर्षाची सत्ता सात वर्षापूर्वी गेली.त्याची कारणे त्यांनी शोधली पाहिजेत. पण,त्याऐवजी सत्तेच्या लालसेपोटी व त्या रागातून ते अशी विधाने करीत आहेत.ते त्यांचे नेते व पक्ष पुरोगामी विचाराचे आहोत,अहिंसावादी आहोत,माता भगिनींचा सन्मान करणारे आहोत,असे भाषणात सांगतात. पण,आता अशा वक्तव्यानंतर जनतेने नेमकं समजायचं काय,अशी विचारणा आ. लांडगेंनी केली. असे संस्कार,जर तुमचे असतील,तर देशातील जनता कधीही तुम्हाला माफ करणार नाही, असे ते म्हणाले.

शहर भाजप कार्यालयाबाहेर हे निषेध आंदोलन झाले. त्यात आ.लांडगे यांच्यासह पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, शहर महिलाध्यक्षा उज्वला गावडे, शहर सरचिटणीस अॅड. मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, नगरसेविका अनुराधा गोरखे,युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, वीणा सोनवलकर, बाळासाहेब भुंबे, ऋषिकेश रासकर, दिनेश यादव, शिवराज लांडगे, मधुकर बच्चे, प्रदीप सायकर, आशा काळे, तेजस्विनी कदम आदी सहभागी झाले होते.यावेळी त्यांनी नाना पटोले हाय,हाय, नाना पटोलेंचे करायचं काय,खाली डोकं,वर पाय अशा घोषणा संतप्तपणे दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT