Pune Crime News : तळेगाव दाभाडे (ता.मावळ,जि.पुणे) नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे (Kishor Aware) यांची काल भरदिवसा तळेगावात निर्घृण हत्या करण्यात आली. त्यातील चारही संशयित हल्लेखोर पोलिसांना काल (१२ मे) रात्रीच शरण गेल्याचे समजले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेहरे दिसल्याने मारेकरी स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाल्याची माहिती मिळाली आहे . मात्र, पोलिसांनी त्यांना दुपारपर्यंत अटक दाखवलेली नव्हती. त्यामुळे ती आता दाखवून आजच त्यांना न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. आवारेंचा खून हा राजकीय वैमनस्यातून झाला नसून तो नगरपरिषदेच्या घंटागाडी कंत्राटातून झाल्याचीही माहिती समोर आली आहे. आवारे यांनी हे कंत्राट रद्द केल्याच्य़ा रागातून त्यांची हत्या झाल्याचे कळते. आवारे यांची हत्या करणाऱ्या एका आरोपीला ते कंत्राट मिळाले होते. आता त्याचे गुन्हेगारीचेही रेकॉर्ड समोर आले आहे. (Kishor Aware Murder case)
मावळचे आमदार सुनील शेळके, त्यांचे बंधू सुधाकर व इतर पाच जणांनी कटकारस्थान करून आवारेंची हत्या केली, अशी तक्रार आवारे यांच्या आईने तळेगाव दाभाडे पोलिसांंकडे केली. या गुन्ह्यात आ. शेळके आणि त्यांच्या बंधूंनाही आरोपी करण्यात आले आहे. मात्र, आपली बदनामी करून राजकारणातून उठविण्यासाठी या गुन्ह्यात गोवल्याचा खुलासा आ. शेळकेंनी केला. तसेच ही बदनामी आपले विरोधक करीत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे त्यांच्याविरुद्ध कसलाच पुरावा हाती न लागल्याने पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी अद्याप समन्स बजावलेले नाही. (Pune Crime news)
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.