Rahul Bajaj sarkarnama
पुणे

दिवंगत उद्योगपती राहूल बजाज यांचे उद्योगनगरीतच उभारले जाणार स्मारक

आकुर्डीतील (Akurdi) बजाज कंपनीच्या (Bajaj Company) आवारात राहूल बजाज (Rahul Bajaj) राहत होते.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : प्रसिद्ध उद्योगपती, माजी खासदार पद्मभूषण राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे नुकतेच (ता.१२ फेब्रुवारी) निधन झाले. त्यांचे व त्यांच्या बजाज उद्योगसमुहाचे पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri-Chinchwad) औद्योगिक विकासात मोठे योगदान आहे. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड महापालिकेने (PCMC) शहरात स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी (ता.१६ फेब्रुवारी) मान्यता दिली.

दिवंगत बजाज यांची कंपनी व ते वास्तव्यास असलेल्या आकुर्डीतील चौकात हे स्मारक उभारले जाणार आहे. आकुर्डीतील बजाज कंपनीच्या आवारात राहूल बजाज राहत होते. कंपनी आवारात राहणारे ते पहिले उद्योजक होते. शहराच्या औद्योगिक विकासात बजाज उद्योग समुहाचे महत्वपुर्ण योगदान आहे. या बजाज समूहाचे बजाज हे माजी अध्यक्ष होते. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांची बजाज कंपनी असलेल्या आकुर्डीतील आकुर्डी चौकात 'राहूल कुमार बजाज' स्मारक उभारण्यास येणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष तथा सभापती अॅड. नितीन लांडगे यांनी सांगितले.

मुळा नदीच्या १४.२० कि.मी. च्या नदीसुधार प्रकल्पाच्या ७५० कोटी रुपये खर्चाचा विषय मान्य करीत अंतिम मंजुरीसाठी त्याची पालिका सभेकडे शिफारस केल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्याची तहकूब आणि या आठवड्याची अशा दोन बैठका ऑनलाईन झाल्या. त्यात १२० विषय मंजूर करण्यात आले. भोसरीत आळंदी रस्त्यावरील सखुबाई गबाजी गवळी उद्यान येथे बहुमजली वाहनतळ सात कोटी ३४ लाख रुपये खर्चून उभारण्यासही मान्यता देण्यात आली. त्यामुळे भोसरी-आळंदी रस्त्यावरील आणि भोसरी परिसरातील वाहने पार्किंगचा प्रश्न मिटणार तसेच, स्थानिक वाहतूक सुरळीत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT