Pune news  
पुणे

दिवाळीला घरी निघाला, पण वाटेतच 'त्याला' मृत्यृने गाठले....

Pune news| दिवाळीसाठी गावी निघालेल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.

सरकारनामा ब्युरो

Pune news | पुणे : दिवाळीसाठी गावी निघालेल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुरुवातीला असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले होते. पण आता याबाबत रेल्वे पोलिसांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. चेंगरून नव्हे तर दम लागल्याने या प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साजन बलदेव मांझी (वय 30, रा. कानती नवादा, गया, बिहार) त्याचा पुतण्या बौधा मांझी (रा.कंटी नवादा, बीथो गया, बिहार ) हे दोघेही पंधरा दिवसांपूर्वी बिगारी कामासाठी पुण्यात आले होते. साजन मांझी हे आजारीही होते. दिवाळीसाठी ते पुन्हा गावी निघाले होते. दोघेजण पुणे येथून बिहारमधील पाटणा येथे जाणार होते.

त्यांची ट्रेन फलाट क्रमांक एकवरुन शनिवारी रात्री नऊच्या सुमारास रवाना होणार होती. ट्रेन आल्यानंतर सर्व प्रवासी आणि त्याचे कुटुंबीय सर्वसाधारण डब्यात प्रवेश करत होते. त्याचवेळी गाडीमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. साजन हा गाडीमध्ये चढत असताना गर्दीत अडकल्याने व दम लागल्याने त्याला त्रास होऊन तो फलाटावर कोसळला. त्यांचा पुतण्या,लोहमार्ग पोलिस व अन्य प्रवाशांनी त्यास बेशुद्धावस्थेतील प्रवाशाला लोहमार्ग रुग्णलायात दाखल केले. तेथे त्याला मृत घोषित केले. साजन बलदेव मांझी यांचा चेंगरून नव्हे तर दम लागल्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

संबंधित प्रवासी आजारी होता. बिहारला जाणाऱ्या रेल्वेत चढत असताना दम लागून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक मिळाली होती. पण मांझी यांचा रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचंगरीत मृत्यु झाला, असे काहीही घडले नाही. शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्युमागचे कारण समजेल." अशी प्रतिक्रिया पुणे लोहमार्ग पोलिस अधीक्षक सदानंद वायसे यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT