NCP Protest
NCP Protest Sarkarnama
पुणे

महापालिकेसमोर आली चक्कं खरीखुरी बोट : राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मागील तीन दिवसांपासून पुण्यात जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. पुणे मनपाचा कार्यकाल संपून गेल्यामुळे प्रशासनराज सुरू आहे. यापूर्वी भाजपची एकहाती सत्ता महापालिकेवर पालिकेवर होती. आता शहराभरात जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. बऱ्याच जागी दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साठून गेले आहे. महापालिकेवर भाजप सत्तेत होती. सत्तेत असताना भाजपने पुण्याची आणि पुणेकरांची दुर्दशा केली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली. मागील कार्यकाळातील भाजपच्या कारभाराचा निषेध व्यक्त करत, पुणे महापालिकेच्या इमारतीसमोरच राष्ट्रवादीकडून अनोखे बोट आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्कं खरीखुरी बोट आणून पालिकेच्या इमारतीसमोरच बोटीत बसून भाजप विरोधात घोषणाबाजी केली. धुव्वाधार पावसामुळे शहरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले. बऱ्याच ड्रेनेज लाईन्स फुटल्या होत्या. वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते पाण्याखाली होते. रस्त्यांना ओढ्याचे रुप प्राप्त झाले होते. धुव्वाधार पावसामुळे पुणेकरांची अक्षरश: दाणादाण उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत पुणे शहराचाही अंतर्भाव करण्यात आले होते. परंतु वास्तवात पुण्यातील भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी मागील पाच वर्षापासून पुणे आणि पुणेकरांची दुर्दशा केली आहे, अशी टीका राष्ट्रवादीकडून यावेळी करण्यात आली.

मागील पाच वर्षे पुणे मनपातील भाजपाचा कारभार पुणेकरांची दुर्दशा करण्यासाठीच होता. भाजपाने स्मार्ट सिटी पाण्यात बुडवून टाकलीच, पुणेकरांनाही पाण्यात बुडवले आहे. बोट दाखवेल तेथे बोटसेवा सुरू झालीच पाहीजे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक होऊन, अनोखे बोट आंदोलन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT