पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) रविवारी पुणे (Pune) दौऱ्यावर येत आहेत. मोदींच्या स्वागतासाठी आणि एकूणच या दौऱ्याची जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यांच्या हस्ते बुहूप्रतिक्षीत मेट्रोच्या दोन टप्प्यांचे उद्घाटन होणार आहे. तसेच संगमवाडी ते बंडगार्डन या नदी काठ सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन, पंतप्रधान आवाज योजनेतील १ हजार घरांची लॉटरी, पीएमपीच्या ७० ई-बसेसचे लोकार्पण, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे व महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन अशाही कार्यक्रमांचा यात समावेश आहे.
दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनासोबतच पुणेकरही सज्ज झाले आहेत. शहरभरात मोदींच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. याशिवाय पुणेकरांच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गिरीश मुरुडकर यांच्याकडून मोदींसाठी खास असा शाही फेटा तयार करवून घेतला आहे. या फेट्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा चक्क ऑस्ट्रेलियन डायमंडपासून आणि सोन्याच्या वापरापासून बनवला जात आहे.
या फेट्याबाबत सरकारनामाशी बोलताना मुरुडकर म्हणाले, ऐतिहासिक पुण्यनगरीत येणाऱ्या पंतप्रधानांसाठी फेटा देखील ऐतिहासिक स्वरूपाचा असावा, यासाठी आम्ही फेट्याचे जवळपास २५ पॅटर्न पाहिले. त्यानंतर त्यांच्या कपड्याच्या विचार करुन आम्ही क्रीम विथ रेड कापडचा वापर केला आहे. तर फेट्यामध्ये अत्यंत उच्च दर्जाचे ऑस्ट्रेलियन डायमंड वापरण्यात आले आहेत. फेट्याच्या वरील बाजूस गोल्ड प्लेट लावली असून त्याला सोन्याचं पाणी दिले आहे.
तर फेट्याच्या मध्यभागात मोत्याच्या सूर्यफुलामध्ये शिवमुद्रा बसविण्यात आली आहे. सूर्यफुलाचं वैशिष्टय म्हणजे, ते नेहमी तेजाकडे, सूर्याकडे पाहत असते, अशीच थीम घेऊन फेटा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रेशमी आणि कॉटनचे कापड वापरण्यात आले आहे. फेट्यामधून हवा आत-बाहेर जावी, त्यांना त्रास होवू नये, यासाठी मध्यभागात जाळी तयार केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.