Corruption  Sarkarnama
पुणे

ACB News : लाचखोर अधिकारी नव्हे तर त्यांचे 'पंटर'च सापडताय 'एसीबी'च्या जाळ्यात!

Corrupt officials : 11 दिवसांत दोघांना अटक, अखेर ते अधिकारी मात्र अद्यापही 'सहीसलामत'

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri News : रेशनकार्ड काढून देण्यासाठी एका ज्येष्ठाकडून दोन हजार आठशे रुपयांची लाच घेताना पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील शंकर शिवाजी क्षीरसागर (वय 32)या खासगी व्यक्ती तथा मध्यस्थाला एसीबी(ACB) पुणे युनीटने 12 डिसेंबरला अटक केली होती.

यानंतर 11 दिवसांतच 20 हजार रुपयांची लाच मागितल्याबद्दल अर्जुन हरिचंद्र वायकर (वय 38) या आणखी एका मध्यस्थ व्यक्तीला पोलिसांनी हिसका दाखविला. त्याच्याविरुद्ध मंचर (ता.आंबेगाव,जि.पुणे) पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.23) लाचखोरीचा गुन्हा दाखल झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, वर्ष संपत आल्याने आपले 'टार्गेट' पूर्ण करण्याचा प्रयत्न पुणे रेंजचे एसीबी युनीट करीत असताना त्यांच्या जाळ्यात मोठे मासे अडकणे सोडा, आता छोटेही सापडत नसल्याचे दिसून आले आहे. केवळ लाचखोरांच्यावतीने लाचेची रक्कम घेऊन काम करून देणारे मध्यस्थ व्यक्तिच पकडले जात आहेत. गेल्या 11 दिवसांत अशा दोन पंटरविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मंचर(Muncher)च्या घटनेत, तर वायकर हा त्रयस्थ व्यक्ती लाच घेताना क्षीरसागरसारखा पकडला गेला नाही. त्यामुळे अखेर त्याने लाच मागितली म्हणून एसीबीला गुन्हा नोंद करण्याची वेळ आली. दुसरीकडे ज्यांच्यासाठी लाच मागितली म्हणून हे पंटर पकडले त्यांना, मात्र या गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेले नाही. तसेच आजच्या गुन्ह्यातही घडले आहे. त्यातही ज्याच्यासाठी वायकरने लाच घेतली, त्या महावितरण अधिकाऱ्याला आरोपी केलेले नाही.

एका 26 वर्षीय तरुणाने वायकरला हिसका दाखवला. त्याचे ड्रायक्लिनींगचे दुकान आहे. त्याने आपल्या लाईट मीटरमधून दुसऱ्या दुकानाला अनधिकृतपणे वीज दिली होती. म्हणून त्याला महावितरण मंचर कार्यालयाने दंड केला. तर हा दंड महावितरण(MSEB) अधिकाऱ्यांना सांगून कमी करून देतो असे सांगून वायकरने त्याच्याकडे 20 हजाराची लाच मागितली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT