Pune ACB News Sarkarnama
पुणे

ACB Pune : मोदीबागेत बडा मासा जाळ्यात ; 'जलसंपदा'अधिकारी रिटायर होण्याआधीच..

ACB Pune News : खेड तालुक्यातील भामा आसखेड सिंचन उपविभागाचे ते उपविभागीय अधिकारी आहेत.

सरकारनामा ब्युरो

ACB Pune News : पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)नव्या टीमचा कारवाईचा धडाका सुरुच आहे. आज त्यांनी जलसंपदा विभागातील बडा मासा गळाला लावला. साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना त्याला पकडले.

तुळशीदास अश्रू आंधळे असे या वर्ग अधिकाऱ्याचे नाव आहे.पुढील वर्षी ते रिटायरच होणार होते. पुणे,पिंपरी-चिंचवडसाठी पाणी आणलेल्या खेड तालुक्यातील भामा आसखेड सिंचन उपविभागाचे ते उपविभागीय अधिकारी आहेत.

जमिन खरेदी विक्री व्यावसायिकाकडे सात लाख रुपयांची लाच मागून त्यातील पहिला साडेतीन लाख रुपयांचा हफ्ता घेताना सायंकाळी त्यांना शिवाजीनगर,पुणे येथील मोदीबागेच्या आवारात पकडण्यात आले.

एसीबीच्या तक्रारदाराने कोळिए (ता.खेड,जि.पुणे) येथे जमिन सपाटीकरण व विकसनाचे काम सुरु केले होते. त्या ठिकाणला आंधळे यांनी भेट दिली. पूर रेषेच्या आत हे काम केल्याचे सांगत कारवाईची धमकी त्यांनी दिली. ती न करण्यासाठी सात लाख रुपये मागितले होते.

पण ही लाच त्यांना द्यायची नव्हती. त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. तिची काल पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आज लगेच लाचेचा `ट्रॅप` (सापळा) झाला.

एसीबीच्या पुणे युनीटचे एसपी अमोल तांबे,अॅडिशनल एसपी सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. या युनिटचे पीआय संदीप वर्हाडे पुढील तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT