राज्य लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली आहे. नवीन अभ्यासक्रम पद्धती २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. ट्विट करत आयोगाने याची माहिती दिली आहे. ''राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
पुण्यात एमपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी एल्गार पुकारला होता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे बालगंधर्व चौकातील झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसले होते. भाजपसह, महाविकास आघाडीचेही नेतेमंडळी या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन गेले. त्यानंतर काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेत विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत आयोगाकडे चर्चा करण्याचं आश्वासन दिलं होतं. शरद पवार यांच्यासह पाच विद्यार्थ्यांचे एक शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी जाणार होते. पण अचानक ऐनवेळी ही भेट रद्द झाली. पण अखेर आज राज्यसेवा आयोगाने आपला निर्णय मागे घेतला.
आयोगाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाशी चर्चा केली होती. एकंदरीत जी परिस्थिती निर्माण झाली होती. त्याबाबत आम्ही चर्चा केली होती. पण काहींनी यात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला. असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.