Crime Sarkarnama
पुणे

अडीच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून खून करणाऱ्यास फाशीची शिक्षा

बालिका घरासमोर खेळत असताना तिचे अपहरण केले होते.

मनोज कुंभार

वेल्हे : पानशेत जवळील कुरण खुर्द (ता.वेल्हे) येथून एका अडीच वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमास काल सोमवारी (ता.२८ फेब्रुवारी) रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने (District Sessions Court) फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. (Pune Police)

याप्रकरणी संजय बबन काटकर राहणार, कादवे, कातकरी वस्ती तालुका, वेल्हे (वय ३८,) असे फाशी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. कुरण खुर्द येथील कातकरी वस्तीतून १५ फेब्रुवारी २०२१ रोजी नराधमाने बालिका घरासमोर खेळत असताना तिचे अपहरण केले होते. अपहरणा बाबत वेल्हे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत वेल्हे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान एका रिक्षातून त्या बालिकेला एक इसम पानशेत रस्त्यावरील मालखेड येथे नेले अशी माहिती गोपनीय विभागून मिळाली असता शोध मोहीम केल्यानंतर हवेली तालुक्यातील मालखेड ते थोपटेवाडी रस्त्यावरील मोरीत (सिमेंटचे पाईप मध्ये) १६ फेब्रुवारी २०२१ ला बालिकेचा मृतदेह सापडला होता.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचे निष्पन्न झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी व आरोपीचा शोध घेण्यासाठी ८ पोलिस पथके विविध ठिकाणी शोध रवाना करण्यात आली होती.

दरम्यान, संशयित आरोपीचे हा रायगड जिल्ह्यामध्ये पळून गेल्याची माहिती मिळताच वेल्हे पोलिसांचे पथक त्याठिकाणी रवाना झाले. भोर मार्गे जाणाऱ्या वरंधाघाट वाहतुकीसाठी बंद असल्या कारणाने वेल्हे पोलिसांनी दहा ते बारा किलोमीटरची पायपीट करून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील नाटे गावामध्ये वीट भट्टी वरून आरोपीला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीवर अपहरण, बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार (पोस्को) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या घटनेमध्ये पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी तपास केला. यामध्ये सहाय्यक फौजदार एस.एस. बांदल, आर.एस. गायकवाड, पोलिस हवालदार अजय साळुंखे, औदुंबर आडवाल, सूर्यकांत ओमासे, एस.पी शिंदे, गोपनीय विभागाचे अभय बर्गे, विशाल मोरे, डी.ए.जाधव, वाय.एस.गरुड, डि.के.शेडगे राहुल काळे, कांतीलाल कोळपे यांनी सहभाग घेतला. तर, न्यायालयीन कारकून म्हणून प्रसाद मांडके, टीएमसी सेलचे विद्याधर निचित यांनी काम पाहिले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे अधीक्षक देशमुख यांनी सदरची केस अतिसंवेदनशील असून याचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची विनंती केली होती. या गुन्ह्यात शिवाजीनगर सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर एक वर्ष बारा दिवसात आरोपीस जिल्हा सत्र न्यायाधीश एस.ए. देशमुख यांनी फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणात १७ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली असून आरोपीस काल (ता.२८ फेब्रुवारी ) फाशीची शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यात सरकारतर्फे ॲड. विलास पठारे यांनी काम पाहिले. तर आरोपीची बाजू ॲड. यशपाल पुरोहित यांनी बघीतली.

गुन्ह्याचा घटनाक्रम ...

  • १) गुन्हा घडलेली तारीख १५ फेब्रुवारी २०२१

  • २) वेल्हे पोलीस स्टेशन मध्ये १६ फेब्रुवारी २०२१ रोजी गुन्हा दाखल.

  • ३) बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल.

  • ४) घटनेचे गांभीर्य ओळखून १६ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे ग्रामीणचे अधीक्षक डॉ .अभिनव देशमुख यांनी आरोपी शोध मोहिमेसाठी आठ विविध तपास पथके तयार केली.

  • ५) आरोपीस ४८ तासात अटक पोलिसांची कामगिरी

  • ६) न्यायालयात हजर केले असता आरोपीस १२ दिवसांची पोलिस कोठडी.

  • ७)पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी खटला जलद न्यायालयात चालवण्याची मागणी .

  • ८) आरोपीस न्यायालयीन कोठडी

  • ९) एक वर्ष बारा दिवसानंतर सोमवार

  • २८ फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हा सत्र न्यायालयाकडून आरोपीस फाशीची शिक्षा.

या शिक्षेत महत्त्वाच्या ठरलेल्या बाबी

  • १)पुणे ग्रामीणचे अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शन.

  • २) वेल्हे पोलिसांची कामगिरी.

  • ३)न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा मदत.

  • ४) सतरा साक्षीदारांची साक्ष.

  • ५) सरकारी वकिलांची कामगिरी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT