DRDO Scientist Pradeep Kurulkar  Sarkarnama
पुणे

Pradeep Kurulkar: कुरुलकरांचा पाय आणखी खोलात; तपासातून खळबळजनक माहिती समोर

DRDO Scientist Pradeep Kurulkar : कुरुलकर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात कसे सापडले? कसून चौकशी होणार...

सरकारानामा ब्युरो

DRDO director Pradeep Kurulkar : देशाच्या संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती पाकिस्तानला देण्याच्या आरोपावरून एटीएसने प्रदीप कुरुलकर यांना अटक केली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना न्यायालयाने १५ मे पर्यंत एटीएस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.

आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानमधून काही मेल आले होते. त्या मेलला त्यांनी प्रतिसाद दिल्याचं समोर आलं आहे. तसेच पाकिस्तानी मेल आयडीवर मेल केल्याचे एटीएसने केलेल्या तपासातून पुढे आले आहे. मेलची माहिती गुगुलने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. पण यामध्ये नेमकं संभाषण काय झालं हे अद्याप समोर आलेलं नाही.

कुरुलकरांनी देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही फोटो शेअर केले असल्याचेही समोर आले आहे. 2022 मध्ये कुरुलकरांनी सहा देशांना शासकीय पासपोर्ट वापरत भेट दिली होती. यावेळी ते कुणाला भेटले? याबाबतची चौकशी करण्यात येत आहे. हे प्रकरण खळबळजनक असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या गुन्ह्याचा सखोल तपास होणे गरजेचं आवश्‍यक असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले.

कुरुलकर यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने जानेवारीत त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला होता. याचा फॉरेंसिक रिपोर्ट मंगळवारी न्यायालयात सादर करण्यात आला. या डिव्हाईसमधील काही डेटा डिलीट केल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, फॉरेंसिक रिपोर्टच्या अनुषंगाने अधिक तपास करण्यात येणार आहे. तसेच बँक स्टेटमेंटमधील नोंदींची चौकशी, तसेच शासकीय पासपोर्ट वापरून कोणत्या देशाला भेटी दिल्या, तेथे कोणाला भेटी दिल्या, या गुन्‍ह्यात कुरुलकरांना कोणी मदत केली, यासह अधिक बाबींचा तपास करण्यात येणार आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT