Bribery| Anil Ramod News:  Sarkarnama
पुणे

Anil Ramod News: लाचखोर अनिल रामोड यांच्यानंतर तीन डझन अधिकारीही सीबीआयच्या रडारवर....

सरकारनामा ब्यूरो

Anil Ramod महसूल विभागातील आयएएस अधिकारी असलेल्या डॉ. अनिल रामोड याला आठ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पडकण्यात आले. त्यांच्यावर झालेल्या या कारवाईनंतर त्यांच्या विभागातील त्याच्याशी संबंधित अधिकार्‍यांचेही धाबे दणाणले आहेत. रामोड यांच्यानंतर त्यांच्या विभागातील तीन डझन अधिकारीही सीबीआयच्या रडावर असल्याची माहिती समोर आली आहे. (After briber Anil Ramod, three dozen officers also on CBI's radar)

या प्रकरणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ अनिल रामोड (Anil Ramod News) यांची सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन मोबदल्याच्या प्रकरणात लवाद म्हणून नियुक्ती केली होती . सोलापूर , सातारा , पुणे जिल्ह्यातील प्रकरणाकडे रामोड यांच्याकडे देण्यात आली होती. रामोड यांच्याकडे पाच जिल्ह्यांचा कारभार देण्यात आला होता. पण याठिकाणी काम करताना त्या ठिकाणांशी संबंधित त्यांनी केलेल्या व्यवहारांची, फायली आणि कामकाजाचीही पडताळणी करण्यात येणार आहे.

फाईलचा प्रवास हा छोट्या कार्यालयापासून आयुक्त कार्यालयापर्यंत असतो. आयु्क्त कार्यालयातून अनेक फाईल्स मंत्रालयातही जातात. मंत्रालयात या फाईल्सचे भवितव्य ठरत असते. रामोड यांच्याकडे महामार्ग आणि रेल्वेल्या भूसंपादनासंदर्भातील प्रकरणांची जबाबदारी देण्यात आली होती. यात भूसंपादन करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात करोडो रुपये दिले जातात. या कामात अधिकार्‍यांकडून या संदर्भातील फाईल्स त्यांच्यापर्यंत येत असल्याने आता या फाइल्सच्या शोध आता सीबीआयने सुरू केला आहे.(CBI -Anil Ramod)

यासोबतच रामोड यांच्याकडून जप्त कलेल्या सहा कोटी जमा करण्यास आणखी कोणाकोणी त्यांना मदत केली. याचाही शोध सीबीआयने सुरू केला आहे. एवढी रोख रक्कम एकाच कामातून तर मिळालेली नाही. मग ती कितीजणांकडून मिळाली. यात कुणाकुणाचे हात ओले झाले, याचाही सीबीआय'ने शोध सुरु केल्याचे संबंधित अधिकाऱ्याने म्हटलं आहे. (Maharashtra Politics)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT