Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : देशात दुही माजवल्यानंतर भाजपचा आता राजकीय पक्षांवरही हल्ला; पवारांचा घणाघात

सरकारनामा ब्युरो

NCP vs BJP : यापूर्वी निवडणूक आयोगाने काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पक्षांना काँग्रेस हा शब्द वापरण्याचा निर्णय दिला. आता असे काय घडले की एका गटाला शिवसेना नाव दिले आणि दुसऱ्या गटाला पोटनिवडणुकीनंतर त्या नावाचा वापर करता येणार नाही. असा प्रश्न उपस्थित करून शरद पवार यांनी त्याचे कारणही स्पष्ट केले.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, "सध्या देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे, ते त्यांना हवे तसे निर्णय करण्यास भाग पाडत आहेत. मग ते निवडणूक आयोग असो किंवा इतर स्वायत्त संस्था. देशातील जनतेत दुही माजविल्यानंतर भाजप आता राजकीय पक्षांवर हल्ला करू लागले आहे."

पुणे शहरात आज अल्पसंख्याक मेळाव्याचे (Minor Community) आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यात पवार यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, "पुणे (Pune) हे समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन जाणारे शहर आहे. विविध भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकता ठेवणारे शहर आहे. शहरातील या बंधुत्वावर गेली अनेक वर्षे आघात होत आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून अशा विचारसरणीविरोधात जोरदार लढा देणे हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे."

पुढे पवार म्हणाले, "देशात भाजपची (BJP) सत्ता आहे. याआधी अनेक पक्षांची सत्ता होती, त्यावेळी देशाच्या लोकशाहीच्या हक्कांवर हल्ले झाले नाहीत. आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशातील स्वायत्त संस्थांच्या कार्यात हस्तक्षेप केला जात आहे. याची सर्वात मोठी किंमत अल्पसंख्याक समाजाला चुकवावी लागली आहे."

यानंतर पवारांनी दिल्लीतील स्थितीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, "दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन तीन महिने झाले आहेत. त्यात केजरीवाल यांना बहुमत मिळाले होते. यावर भाजप खूश नसल्याने त्यांनी तीन महिने तेथे महापौरपदाची निवडणूक होऊ दिली नाही. निवडणूक आयोगाने तीन वेळा निवडणूक जाहीर करूनही सरकारने ती थांबवली. याविरोधात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. देशाच्या राजधानीत असे प्रकार घडत असतील तर जे सत्तेत आहेत ते इतर राजकीय पक्षांना काम करू देणार नाहीत. असे सरकारच्या हातात आज देश आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT