MLA Sunil Tingare News :  Sarkarnama
पुणे

MLA Sunil Tingare News : आमदार टिंगरे यांनी उपोषणास्त्र उपासल्यानंतर मनपा प्रशासनाला आली जाग !

Pune News : प्रलंबित कामे करण्यास पालिकेकडून सुरूवात...

सरकारनामा ब्यूरो

MLA Sunil Tingare News : पुण्यातील वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे (Sunil Tingre) यांनी उपोषण केले होते. पुण्यातील प्रलंबित प्रश्नांकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे, यामुळे त्यांनी उपोषण अस्त्र उपसले होते. त्यांच्या या उपोषणाची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. प्रलंबित कामे शुक्रवारपासून पुर्ण करण्यास सुरूवात होईल. तसेच, वाहतुकीला अडथळा ठरणारी पोरवाल रस्त्यावरील भिंत पाडून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

वडगाव शेरी या मतदारसंघातील वाहतुकची कोंडी, प्रलंबित रखरखडले रस्ते, प्रस्तावित उड्डाणपूल, मतदारसंघातील विशेषत: लोहगाव पाणी समस्या, यांसारख्या प्रश्न घेऊन आमदार टिंगरे आक्रमक झाले होते. या प्रश्नासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे सतत प्रश्न लावून धरूनही त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नव्हती. यामुळे आमदार टिंगरे यांनी महापालिकेसमोर उपोषणाला बसले. उपोषणानंतर प्रशासनाने त्यांना लेखी आश्वासन दिले आहे .

त्याची गांभीर्याने दखल घेत महापालिका प्रशासनाने त्यांना लेखी आश्‍वासन दिले.महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रखडलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी उपायुक्त किशोरी शिंदे, सहाय्यक आयुक्त नामदेव बजबलकर, अधिक्षक अभियंता मीरा सबनीस आदी उपस्थित होते.

ढाकणे यांनी विमानतळ रस्त्यावरील 509 चौक, विश्रांतवाडी चौकातील धार्मिक स्थळ स्थलांतरीत करण्याची पर्यायी जागा, धानोरीतील लक्ष्मी टाऊनशीप ते स्मशान भुमी रस्त्याची पाहणी केली. त्यासंबधीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. धानोरीतील संरक्षण विभागाच्या जागेबाबत त्यांच्या व वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याच्याही यावेळी सुचना दिल्या. लोहगावच्या पाणी पुरवठा, विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपुल यांच्या लवकरच निविदा प्रक्रिया राबविल्या जातील तसेच नगर रस्ता बीआरटी मार्ग काढण्याबाबत वाहतुक पोलिस, पीएमपी प्रशासनासमवेत बैठक घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्याचेही आश्‍वासन यावेळी दिले.

दरम्यान, याबाबतीत आमदार टिंगरे म्हणाले, "महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज वडगाव शेरीतील प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी पाहणी केली. काही प्रश्‍न तत्काळ सोडविण्यास प्राधान्य दिले. तर पाणी, उड्डाणपुलाबाबत लवकरच निविदा प्रक्रिया राबवू सांगितले. बीआरटी मार्ग काढण्याबाबतही त्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT