IPS Krishna Prakash News |Sharad pawar|
IPS Krishna Prakash News |Sharad pawar|  
पुणे

मुदतपूर्व बदलीनंतर IPS कृष्ण प्रकाश पोहचले शरद पवारांच्या दरबारात

सरकारनामा ब्युरो

पुणे : आर्यनमॅन आणि अल्ट्रामॅन किताब जिंकणारे पिंपरी-चिंचवडचे (Pimpari Chinchwad) पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश तथा केपी (Krisha Prakash) यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली. त्यांच्या या तडकाफडकी या बदलीमुळे पिंपरी-चिंचवडकरांनाही धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांची बदली रद्द करण्याची मागणी लगेच सुरु झाली आहे.

खास बाब म्हणजे कृष्ण प्रकाश हे देखील या तडकफडकी बदलीमुळे भलतेच नाराज झाल्याचे दिसत आहेत. म्हणूनच ते आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शरद पवारांच्या शब्दाला किती महत्व हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. म्हणूनच कृष्ण प्रकाश आज शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी शरद पवारांना साकडं घालायला गेल्याची चर्चा सुरु आहे.

आठवड्याभराची सुट्टी घेऊन कृष्ण प्रकाश हे परदेशात गेले होते. कृष्ण प्रकाश यांनी नुकतीच १२६ वर्षे जुनी मॅरेथॉनमध्ये यांनी (ता.१८) जगातील सर्वात जुनी ( १२६ वर्षे) जुनी बोस्टन मॅरेथॉन पूर्ण केली. पण ते भारतात परतण्यापुर्वीच झालेल्या बदलीने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

ते परदेशातून येण्यापूर्वीच गृहविभागाने त्यांची उचलबांगडी करत त्यांच्याजागी नवनियुक्त आयुक्त अंकुश शिंदेंनी तातडीनं पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची जबाबदारी दिली. पण अद्यापही कृष्ण प्रकाश यांनी त्यांचा नवा पदभार हाती घेतलेला नाही. कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांची अशी उचलबांगडी केल्याने ते भलतेच नाराज झाले आहेत.

या बदलीला स्थगिती मिळावी यासाठी ते शरद पवारांच्या दरबारात पोहोचल्याच्या चर्चा आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांच्या बदलीसोबत ठाणे आणि कोकणातल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. मात्र त्या बदल्यांना मंत्री एकनाथ शिंदेंनी अवघ्या बारा तासात स्थगिती दिली. अशीच स्थिगिती मिळवण्यासाठी कृष्ण प्रकाश खटाटोप करत आहेत. |

आयुक्त पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच कृष्ण प्रकाश अचानक झालेल्या बदलीने नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी व्यक्त करण्यासाठी परदेशातून येताच शरद आता पवारांची भेटीनंतर कृष्ण प्रकाशांच्या पदरी काय पडतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT