Shivsena Sarkarnama
पुणे

Pune Shivsena : पुण्यातील शिवसैनिक आक्रमक, थेट पोलीस आयुक्तलयासमोरच आंदोलन; काय आहे कारण ?

Shivsena Agitation : शिवसैनिकांच्या वतीने आयुक्तांना निवेदन

सरकारनामा ब्यूरो

Pune Shivsena Agitation in Pune : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षपार्ह्य मजकूर प्रसारित केला जात आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांची बदनामी केली जात आहे. संबंधित व्यक्तीला अटक करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले. (Latest Marathi News)

अभय नामक ट्विटर अकाउंटवरून अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी केली जात आहे. या अंकाउंटवरून सतत बदनामीकारक मजकूर प्रसारित केला जात आहे. यासह मॉर्फ केलेले फोटो पोस्ट केले जातात. मुख्यमंत्री यांच्याबाबत आक्षेपार्ह्य लिखाण, अपशब्द वापरले जातात. यामुळे पुण्यातील शिवसैनिक आक्रमक झाले. संबंधित ट्विटर अंकाउट असणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. त्याला अटक करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

या मागणीसाठी शहरातील शिवसैनिक शनिवारी (ता. १७) पुणे आयुक्तालयासमोर जमले. यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी पुणे शहर शिवसेना, युवासेना, महिला आघाडीतील शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. यानंतर संबंधित आरोपीवर आयपीसी अॅक्ट 469, 499, 500 नुसार सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आयुक्तांनी आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. याबाबत शिवसेना शहरप्रमुख प्रमोद (नाना) भानगिरे यांनी माहिती दिली.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT