Talathi and student death case Sarkarnama
पुणे

Talathi and student death case : तलाठी अन् युवतीचा मृतदेह आढळला; चिठ्ठीत बरचं काही लिहून ठेवलं, नेमकं काय घडलं?

Dead Bodies of Ahilyanagar Talathi and Pune Junnar College Girl Found : निरीक्षक किरण अवचर यांनी जुन्नर पोलिस आणि रेस्क्यू टीमने रामचंद्र पारधी आणि रुपाली खुटाण यांचे मृतदेह दरीतून बाहेर काढल्याची माहिती दिली.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Shrigonda news : पुण्यातील जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात दुर्गावाडी इथल्या कोकणकडा परिसरातील सुमारे 1200 फूट खोल दरीत अहिल्यानगरमधील तलाठी आणि जुन्नरमधील महाविद्यालयीन युवतीचे मृतदेह आढळले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात या दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. श्रीगोंदा इथं तलाठी म्हणून कार्यरत असलेले रामचंद्र पारधी (वय 40), तर रुपाली संतोष खुटाण (रा. आंबोली, ता. जुन्नर) अशी मयतांची नावे आहे.

निरीक्षक किरण अवचर यांनी जुन्नर पोलिस आणि रेस्क्यू टीमने हे मृतदेह दरीतून बाहेर काढल्याची माहिती दिली. रामचंद्र पारधी मूळ दुर्गावाडीचे असून, श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) तलाठी (Talathi) म्हणून कार्यरत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते, याबाबत त्यांची पत्नीने अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार देखील नोंदवली होती. याशिवाय रूपाली देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल होता.

जुन्नरच्या (जि. पुणे) रिव्हर्स वॉटर फॉलजवळ पांढऱ्या रंगाची कार काही दिवसांपासून उभी होती. स्थानिक ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी शोध घेतल्यावर कड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला आढळल्या. दोन दिवस रेस्क्यू टीमने दरीजवळील परिसरात शोधकार्य केले. रेस्क्यू टीमने दरीत उतरून शोध घेतल्यानंतर रूपाली आणि रामचंद्र यांचे मृतदेह आढळले.

तलाठी रामचंद्र पारधी आणि रुपाली खुटाण या दोघांच्या घटनास्थळी स्वतंत्र सुसाइड नोट आढळल्या आहेत. रामचंद्र पारधी यांनी आपल्या आई-वडील व भावाची माफी मागून पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. पत्नी आणि तिच्या नातेवाईकांविरोधात कायदेशीर कारवाई करा, असे रामचंद्र पारधी यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे.

रुपाली खुटाण हिने सुद्धा आपल्या आईवडिलांकडून होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. या दोघांनी कुटुंबियांवर गंभीर आरोप करत एकत्रित आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, दोघांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीच्या आधारे गुन्ह्याची नोंद करत कारवाई सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT