Ajit Gavhane
Ajit Gavhane sarkarnama
पुणे

राष्ट्रवादी लागली कामाला; शंभर प्लसचा दिला नारा

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : राज्यात नुकताच सत्ताबदल झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (NCP) सहभाग असलेल्या महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता जाऊन भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) बंडखोर सत्तेत आले. मात्र, या सत्ताबदलाचा महापालिका निवडणुकीवर कोणताच परिणाम होणार नसल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. विजय आपलाच आहे, असे सांगत शंभर प्लस नगरसेवकांचे मिशन साध्य करण्यासाठी आतापासून कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gawhane) यांनी नव्या शहर कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत आज (ता.७) येथे केले.

गेल्या पाच वर्षांत पिंपरी पालिकेतील भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे शहरातील जनताच त्यांना सत्तेतून हद्दपार करणार आहे, असे गव्हाणे म्हणाले. भाजपने लाचखोरी, खंडणीखोरी व भ्रष्टाचार केल्याने शहराचा विकास खुंटल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपचा हा भ्रष्टाचार व त्याजोडीने राष्ट्रवादी महापालिकेत सत्तेत असताना शहराचा झालेला विकास हा जनतेच्या दरबारात प्रभावीपणे मांडण्याचे काम प्रत्येकाने करायचे आहे, असे ते म्हणाले. पक्षाची पिंपरी-चिंचवड शहराची नवी कार्यकारणी, सर्व सेलची तसेच प्रभाग अध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पहिल्या मासिक सभेत ते बोलत होते.

महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, कार्याध्यक्ष राहूल भोसले, प्रशांत शितोळे, विधानसभा अध्यक्ष शाम लांडे, पंकज भालेकर, विनोद नढे, संघटन सचिव अरुण बोऱ्हाडे, नारायण बहिरवडे, माजी नगरसेवक मयूर कलाटे, विक्रांत लांडे, मोरेश्वर भोंडवे, कार्याध्यक्ष फजल शेख, प्रवक्ते तथा मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे आदी यावेळी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अजितदादा पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी संमत करण्यात आला. २२ जुलैचा अजितदादांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यासंदर्भात नियोजनही करण्यात आले. सभासद नोंदणीचा आढावाही घेण्यात आला. तसेच बूथ यंत्रणा नियोजन आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर यावर मार्गदर्शन करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT