Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Baramati & Ajit Pawar : बारामतीच्या पराभवाला कोण जबाबदार? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं...

Sunil Balasaheb Dhumal

Baramati Lok Sabha Result 2024 : देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव केला. या निकालाने मी आश्चर्य चकीत झालेलो आहे. या पराभवास मीच स्वतः जबाबदार आहे. याला दुसरे कुणीही जाबाबदार नाहीत, असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले. आता झालेल्या चुका दुरुस्त करून विधानसभा निवडणुकीस सामोरे जाणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मंथन बैठक पार पडली. या बैठकीनंतर पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बारामती लोकसभेत झालेला पराभव स्वीकारला असून त्यावर विचार करणार असल्याचे स्पष्ट केले.

बारामतीच्या निकालाने मीही आश्चर्यचकीत झालेलो आहेत. १९९१ पासून मी तेथे काम करतो. बारामतीकरांनी मला सतत पाठिंबा दिला आहे. आता त्यांनी असा का निर्णय घेतला हे समजत नाही. माझ्या स्वतःमुळे अपयश आले आहे. मीच बारामतीत कमी पडलो, हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे कुणालाही दोष द्यायचा नाही. मी नेमका कुठे कमी पडलो याबाबत लोकांशी चर्चा केल्यानंतर समजेल, असेही अजितदादांनी सांगितले.

पराभवाची कारणे

बारामतीचा पराभवाचे आश्चर्य व्यक्त करताना अजितदादांनी त्याची काही कारणेही सांगितले. आम्हाला शहरासह ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. जागा वाटपांत दिरंगाई झाली. काही नेत्यांनी केलेल्या संविधान बदल्याची वक्तव्यांने मागासवर्गीय समाज आमच्यापासून फटकून राहिला. मुस्लिम समाज आमच्यापासून दूर केला. चंद्रकांत पाटलांचेही विधान महागात पडले. शेवटी जनतेचा निर्णय आहे. आता लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी जीवाचे रान करू आणि विधानसभेच्या कामाला लागू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कुणीही कुणाच्या संपर्कात नाही..

निकालानंतर आमदार रोहित पवारांनी अजित पवार गटातील काही आमदार संपर्कात असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली होती. यावर अजितदादा म्हणाले, आमच्यातील कुणीही कुणाच्या संपर्कात नाही. सर्वजण आमच्याबरोबरच आहेत. विरोधकांनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे. आजच्या मिटींगला सर्वजण उपस्थित होते. काही जण अडचण आजारी असल्याने येऊ शकले नाहीत, असे म्हणत अजितदादांनी रोहित पवारांचा दावा फेटाळला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT