Walchandnagar News: इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 385 अर्ज वैध ठरले आहेत. कोट्यावधींचे कर्ज असलेल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. पण एकेकाळी याच साखर कारखान्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीला महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण आता अजितदादांच्याच निकटवर्तीयानं अर्ज मागे घेण्यासाठीच्या पहिल्याच दिवशी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Chhatrapati Sugar Factory Election) 600 नागरिकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत 115 अर्ज अवैध ठरले आहे. 2015 नंतर छत्रपती कारखान्याची निवडणूक झाली नसल्यामुळे अनेकजण इच्छुक आहेत.
यामध्ये विद्यमान संचालक मंडळातील उपाध्यक्ष अमोल पाटील, संचालक अभिजित रणवरे, नारायण कोळेकर, रसिक सरक, बाळासाहेब सपकळ, दत्तात्रेय सपकळ,गणेशकुमार झगडे,लक्ष्मण शिंगाडे,तेजश्री कुंदन देवकाते हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.
तसेच नेचर डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई, निमसाखरचे उद्योजक विनोद रणसिंग यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सणसर परिसरातील सर्वाधिक नागरिक छत्रपती कारखान्याची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. लासुर्णेमधून अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
आजपासून उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास सुरवात झाली असून पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे किरण गुजर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेवून राजकीय अफवांना पूर्णविराम दिला. 2 मे अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. असून 2 मे नंतर छत्रपतीच्या कारखान्याच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.