Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील विमान अपघाताबाबत मी १० तारखेला पत्रकार परिषद घेत प्रेझेंटेशन करून आमचे मुद्दे मांडणार आहे. असल्याच सांगितला आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील या अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत सोनवणे म्हणाले, विमानात सहा जण प्रवास करत होते, तर पाच मृतदेहच कसे सापडले? तसेच विमानात स्फोटक किंवा बॉम्ब होता का, याचाही तपास झाला पाहिजे, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे. यानंतर याबाबत केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, चौकशी सुरु आहे ब्लॅक बॉक्स सापडला असून 'एआयबी'ची टीम यावर काम करत आहे. डाटा डाऊनलोड होत आहे. ब्लॅक बॉक्समधून मिळालेल्या माहितीच विश्लेषण होईल आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर याचा सगळा अहवाल समोर येईल. त्यामुळे या विषयावर ज्यांना कुणाला बोलायचं आहे. त्यामध्ये रोहित पवार असतील व इतर कोण ते बोलतील त्यांचं जे म्हणणं मांडतील. मात्र कृपया या घटनेच कोणीही राजकारण करू नये विनंती आहे, असं मोहोळ म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारला असता मोहोळ म्हणाले, इतका मोठा नेता गेला आहे राज्याचे आणि माझ्या पुणे जिल्ह्याचे खूप मोठे नुकसान झालं आहे. अजूनही आपण त्या दुःखात आहोत त्यामुळे या दुःखद प्रसंगी स्वतःच राजकारण कुणीही या विषयावर करू नये एवढी विनंती आहे.
गेल्या आठ दहा दिवस ज्या गोष्टी घडत आहेत. काही संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र चौकशी होईल अहवाल येतील त्यानंतर याबाबत बोलणं योग्य ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणांमध्ये अलर्ट आहेत. ते स्वतः लक्ष घालत असून त्यांनी CID ची चौकशी लावली आहे.
तसेच फडणवीसांनी स्वतः याबाबत केंद्र सरकारकडे चौकशीची मागणी केली आहे. त्यानुसार DGCI आणि AIB यावर काम करत आहे. त्यामुळे थोडं थांबा सगळं समोर येईल. त्यामुळे दादा गेलेत हे खूप मोठे दुःख असून त्याचं आपल्या राजकारणासाठी कोणी वापर करू नये असं मुरलीधर मोहोळ म्हणाले
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.