Ajit Pawar over Dhas and Munde Meet Sarkarnama
पुणे

Ajit Pawar over Dhas and Munde Meet : सुरेश धस अन् धनंजय मुंडे भेट ; प्रश्न विचारताच अजितदादा म्हणाले 'तुला काय वाईट वाटतं? ते..'

Suresh Dhas Dhananjay Munde Meeting : सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या या भेटीवर संतोष देशमुख कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे, त्यावरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे ; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत?

Sudesh Mitkar

Ajit Pawar Pune Press News : बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी आवाज उठवत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्ती वाल्मीक कराड यांना लक्ष्य केलेले आहे. मात्र आता या प्रकरणाला दोन महिने उलटल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची दोनवेळा गुप्त भेट झाल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळही उडालेली आहेत. तर या भेटीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुरेश धस आणि धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांत दोन भेटी झाल्यामुळे राजकारण चांगलच तापलं आहे. या भेटीनंतर सुरेश धस यांच्या भूमिकेबाबत साशंकताही व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे भेटीबाबत सुरेश धस यांनी देखील स्वतः दुजोरा दिला असून धनंजय मुंडे आजारी असल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली असल्याचा त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. असं असलं तरी विरोधकांकडून आता जोरदार हल्लाबोल केला जात आहे .

दरम्यान, पुणे महापालिकेच्या वर्धापनादिन निमित्त पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी पालिका इमारतीला भेट दिली. यावेळी मीडिया प्रतिनिधींनी त्यांना सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत विचारले असता, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले तुला काय वाईट वाटतं?, असा प्रतिसवाल त्यांनी पत्रकारास केला.

अजित पवार पुढे म्हणाले, ते मंत्री आहेत आणि ते दुसरे आमदार आहेत. या महाराष्ट्राला यशवंतराव यांची आपल्याला सुसंस्कृतपणाची शिकवण आहे. आमची महायुती होण्यापूर्वी देखील चंद्रकांत पाटील आणि आम्ही भेटायचो बोलायचे आमची काही दुश्मनी नाही. त्यावेळी विचारधारा वेगेळी आता आमची विचारधारा जुळलेली आहे, त्या पद्धतीने आम्ही पुढे चालेलो आहोत. त्यामुळे त्यांचे पूर्वीपासूनचे संबंध आहेत. जर तुम्ही आजारी पडला तर सहकारी पत्रकार म्हणून माणुसकीच्या नात्याने तुम्हाला पण भेटायला येतात ना? अशा पद्धतीने ते गेले होते, वेगळा अर्थ काढू नये.

सुरेश धस(Suresh Dhas) यांच्या या भेटीनंतर देशमुख कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, देशमुख कुटुंबामध्ये खूप दुःख आहे. असं हत्या झाल्यानंतर, आघात झाल्यानंतर प्रत्येकाला अशी भावना येणं साहाजिकच आहे. मात्र यंत्रणेकडून लवकरात लवकर रिपोर्ट यावे असे अपेक्षित आहे.

याशिवाय ''यामध्ये दोषी कोण असेल त्यांची फिकर केली जाणार नाही. कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. यातली एक व्यक्ती साठ दिवस झाले तरी सापडत नाहीये आम्हाला पण त्याचं वाईट वाटत आहे.''अस अजित पवार म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT